जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
उमरेड:-उमरेड शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शुक्रवार रोज दिनांक 10/03/2023 ला शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक बांधवांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

उमरेड शहरातील मॉ वैष्णवी कॉम्पेल्क्स एस टी बस स्टॅन्ड येथील परिसरातून भव्य शोभायात्रा डीजे च्या गजरात काढण्यात आली होती. शोभायात्रा बघण्यासाठी उमरेडकर नागरिकांची ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आयोजित कार्यक्रमाला मंगल पांडे,दाऊ पाठक,पुष्पा देशमुख,संगिता किरपाते,मंगला तळेकर, राजश्री बेले, संदिप गुंफलवार, राजेश देशपांडे, लिलाधर सिर्सिकर ,ताराचंद्र बावने शिवलाल बळवाईक सोनबाजी ताडस्कर, देवेन्द्र नखाते, राज बावनकुळे, हेमंत दांडेकर वैभव मेश्राम, वैभव कास आदी पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना