जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि. 14 जून : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, मुल, चिमूर, घुग्घूस व नागभिड या नगर परिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने सोमवार दि. 13 जून 2022 रोजी निश्चित केले आहे.
सदर आरक्षण सोडतीबाबत हरकती व सूचना बुधवार, दि. 15 जून ते मंगळवार, दि.21 जून 2022 पर्यंतच्या कालावधीत संबंधित नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालयात मागविण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना