Breaking News

दारू पिऊन गाडी चालवणं पडणार महागात

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर/चिमूर :- दिनांक २ मार्च व ३ मार्च, २०२६ रोजी होळी व धुलीवंदन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सदर उत्सावादरम्यानमोठ्या प्रमाणात रंगाची उधळण होते. तसेच ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जातात. या कालवधीत काही अतिउत्साही तरुण मंडळी मद्य प्राशन करुन दुचाकी / चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश (Rash) ड्रायव्हिंग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठया प्रमाणात गंभीर अपघात घडुन जिवितहानी होत असते. त्यांच्या अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याचे दृष्टीने दिनांक २ मार्च, २०२६ ते दिनांक ३ मार्च, २०२६ या कालावधीत संपुर्ण चंद्रपूर जिल्हयामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार आहे.

याद्वारे सर्व नागरीकांना सुचीत करण्यात येते की, कोणीही मद्य प्राशन करुन वाहन चालविणार नाही. जर मद्य प्राशन करुन वाहन चालवितांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जिल्हयातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपूर व जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह ची विशेष मोहीम घेवुन कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

तरी, सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, “होळी व धुलीवंदन साजरा करतांना वाहनधारकांच्या चुकीमुळे निष्पाप नागरीकांचा बळी जावुन होळीच्या रंगाचा बेरंग होवु नये” या करीता वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. पोलीस व प्रशासनाद्वारे वेळोवेळी देण्यात येणारे सुचनांचे पालन करून होळी व धुलीवंदन उत्सव शांततेत पार पाडण्यात सहकार्य करावे.

* ज्वाला समाचार व पोलीस प्रशासनाकडून होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा *

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved