Breaking News

नागपूरच्या कंपनीत भीषण स्फोट

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

विशेष प्रतिनिधी – नागपूर

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील SBL बारूद कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आतापर्यंत १५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. जखमींना उपचारासाठी नागपूर येथे रुग्णालयात हलवण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार राऊळगाव येथील SBL कंपनीत सकाळी सुमारे ७ वाजून १० मिनिटांनी पहिला स्फोट झाला. कंपनीमध्ये स्फोटके (बारूद) तयार करण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन त्यानंतर आग लागल्याचे सांगितले जात आहे. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे व आतमध्ये अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

आसपासच्या गावांतील नागरिक या कंपन्यांमध्ये काम करतात. स्फोटाचे मोठे आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमले असून या घटनेबाबत स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही प्रत्यक्षदर्शींनी पहिल्या स्फोटानंतर आणखी स्फोट झाल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून बचावकार्य सुरू आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved