Breaking News

स्थायी समिती, परिवहन व अन्य विषय समिती सदस्यांची निवड

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

*मनपाच्या विशेष सभेत निवड झालेल्या सदस्यांची महापौरांनी केली घोषणा*

विशेष प्रतिनिधी – नागपूर

नागपूर, ता. २४ :- नागपूर महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये स्थायी समितीतील १६ सदस्य, परिवहन समितीचे १२ व दहा विषय समित्यांमध्ये सदस्यांची आज (ता. २४) निवड करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेची विशेष सभा रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर श्रीमती निता ठाकरे होत्या. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होते.

महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी स्थायी समितीमध्ये १६ सदस्यांची निवड करण्याच्या प्रस्तावाचे वाचन केले व सभागृहातील पक्षीय बलाबल अनुसार गटनेत्यांनी सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात द्यावी, अशी विनंती केली. त्यानुसार सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर व मुस्लिम बहुजन विकास आघाडीचे गटनेते श्री. शकील पटेल यांनी बंद लिफाफ्यामध्ये सदस्यांची नावे दिली.

या पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीमध्ये भाजपचे ११, काँग्रेस-शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे ४ व मुस्लिम बहुजन विकास आघाडीच्या एका सदस्यांची निवड करण्यात आली. परिवहन समितीमध्ये भाजपचे ८ काँग्रेस-शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे ३ व मुस्लिम बहुजन विकास आघाडीच्या १ सदस्यांचा समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे अनुक्रमे स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती, विधी विशेष समिती, शिक्षण विशेष समिती, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समिती, क्रीडा विशेष समिती, महिला व बालकल्याण विशेष समिती, जलप्रदाय विशेष समिती, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती व अग्निशमन व विद्युत विशेष समितीमध्ये पक्षीय बलाबल नुसार निवड करण्यात आली. गटनेत्यांनी बंद लिफाफ्यात दिलेल्या सदस्यांच्या नावाचे वाचन निगम सचिव व उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी सभागृहात केले. त्यानंतर महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी या सदस्यांची निवड संबंधित समितीत्यांमध्ये सदस्य म्हणून झाल्याची घोषणा केली.

स्थायी समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांची नावे :

1. श्रीमती शिवानी सुधांशु दाणी – भाजप

2. श्रीमती स्वीटी किशोर भिसीकर- भाजप

3. श्रीमती प्रमिला अजय गौर – भाजप

4. श्रीमती विशाखा प्रकाश मोहोड – भाजप

5. श्रीमती निरंजना महेश पाटील – भाजप

6. श्रीमती ममता ठाकूर – भाजप

7. श्रीमती साधना बरडे – भाजप

8. श्रीमती अभिरुची अनिल राजगिरे – भाजप

9. श्रीमती शितल विजय रारोकर – भाजप

10. श्रीमती सानवी रविंद्र तरुडकर (शेंडे) – भाजप

11. श्रीमती मानसी निखिल सिमले – भाजप

12. श्रीमती मेरिस्टेला देवा उसरे – काँग्रेस

13. श्री. अभिजीत प्रभूकांत झा – काँग्रेस

14. श्री. वसीम खान रहीम – काँग्रेस

15. श्री. अभिषेक शंभरकर – काँग्रेस

16. श्री. असलम खान मुल्ला – मुस्लिम लिग

परिवहन समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांची नावे :

1. श्रीमती मंगला शशांक खेकरे – भाजप

2. श्री. सुधीर उर्फ बंडू हरीदास राऊत – भाजप

3. श्री. विजय होले – भाजप

4. श्रीमती अर्चना पडोळे – भाजप

5. श्रीमती प्रमिला प्रीतम मथरानी – भाजप

6. श्रीमती मंगला संजय मस्के – भाजप

7. श्रीमती रुपाली परशु ठाकूर – भाजप

8. श्रीमती पूजा अमित पाठक – भाजप

9. श्री. शैलेश पांडे – काँग्रेस

10. श्री. किशोर कुमेरिया – शिवसेना (उबाठा)

11. श्री. दिनेश वसंतलाल यादव – काँग्रेस

12. श्री. अब्दुल. करीम अब्दुल करीम पटेल (शकील पटेल) – एमआयएम

(१) स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती
श्रीमती अश्विनी जयंत जिचकार

श्री.प्रदिप वसंतराव पोहाणे

कु. दुर्गेश्वरी कैलास कोसेकर

श्री.महेंद्र रमेश धनविजय

श्री.चंद्रकांत मनोहरराव खंगार

श्रीमती विद्या राजेश कन्हेरे

श्रीमती सुनिता दिपकराव तभाने

श्रीमती कुमुदिनी प्रफुल्ल गुडधे

मो. मुजतबा मो.मुस्तफा अंसारी

(2) वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती

श्रीमती मनिषा चक्रधर अतकरे

श्री श्रीकांत गजाननराव आगलावे

श्री विक्रम जगदिश ग्वालबंसी

श्रीमती पुजा जितेंद्र भुगावंकर

श्री योगेश मारोतराव मडावी

श्रीमती रजनी सचिन वानखेडे

श्री. प्रमोद जोगेंद्रसिंग ठाकुर

श्रीमती भावना संतोष लोणारे

सोफिया आसिफ शेख (मांडवा)

(३) विधी विशेष समिती

कु. निधी नितिन तेलगोटे

अॅड. संजयकुमार कृष्णराव बालपांडे

श्रीमती धनश्री आशिष देशपांडे

श्रीमती शारदा सुरेश बारई

श्री कल्पक सदाशिव भनारकर

श्री निलेश मनोहर गायधने

अॅड. शैलेन्द्र श्रीराम डोरले

अॅड. स्नेहल बंडू उर्फ ज्ञानेश्वर ठाकरे

श्री पवन बाळुजी कोये

(४) शिक्षण विशेष समिती

श्रीमती संतोष देवी दीपक लढ्ढा

श्रीमती भारती विकास बुंदे

श्री विनय विवेक दाणी

श्रीमती वैशाली विलास उदापुरकर (टोळ)

श्री.राम एकनाथ कुंभलकर

श्री. अंकीत सुखनंदन चौधरी

श्रीमती कांचन सतिश चव्हाण

सय्यद मुस्कान सय्यद इरफान

श्रीमती वर्षा बंडू डोंगरे

(५) गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समिती

श्रीमती रूतीका योगेश मसराम

श्री.संदीप रमेशराव गवई

श्री.नागेश महादेव मानकर

श्री. योगिता धनराज तेलंग

श्री.हेमंत शांताराम बरडे

श्री.रितेश बापूराव पांडे

श्री.विवेक रमेश निकोसे

श्रीमती सुजाता विठ्ठलराव कोंबाडे

श्री.पवन बाळुजी कोये

(६) क्रीडा विशेष समिती

श्रीमती दर्शनी स्वानंद धवड

श्री.संजय अरूणराव चावरे

श्रीमती.ज्योती अरविंद देवघरे

श्री.ईश्वर रामकृष्णा ढेंगळे

श्रीमती कल्पना विक्रम शर्मा

श्री.प्रविण हेमराज गीन्हे

श्री.शुभम शेषराव मोटघरे

श्री.गौतम हरिभाऊ अंबादे

मो. मुजतबा मो.मुस्तफा अंसारी

(७) महिला व बाल कल्याण विशेष समिती

श्रीमती सारिका सुनिल नांदुरकर

श्रीमती तारा (लक्ष्मी)ओमप्रकाश यादव

श्रीमती चेतना गुलशन टेकाम (निमजे)

श्रीमती महेश्वरी देवेंद्र बिसेन

श्रीमती रेखा गिरधारी निमजे

कुमारी लक्ष्मी चंद्रभुषण हत्तीठेले

श्रीमती शिला दिनेश तराळे

श्रीमती कल्पना राजेंद्र द्रोणकर

तसनीम परवीन नियामत खान ताजी

(८) जलप्रदाय विशेष समिती

श्रीमती दिव्या दिपक धुरडे

श्री.विजय (पिंटू) झलके

श्री. योगेश रूपराव पाचपोर

श्री.रामदास व्दारकाप्रसाद शाहू

श्री.सचिन प्रकाशराव नाईक

श्री. शेषराव शंकरराव गोतमारे

श्रीमती मंजुषा गणेश चाचेरकर

श्री.सुहास रमेशराव नानवटकर

तसनीम परवीन नियामतखान ताजी

(९) कर आकारणी व कर संकलन विशेष समिती

श्रीमती सरीता ईश्वर कावरे

श्री. विरेंद्र घनश्यामदास कुकरेजा (विक्की)

श्री.अजय रघुनाथ बोढारे

श्री.रमेश दिगंबरराव भंडारी

श्री.सुनिल दुलिचंद हिरणवार

श्री.हरेश्वर (बालु) दादाराव रारोकर

श्रीमती सरस्वती विजय सलामे

श्री. मनोजकुमार धोंडुजी गावंडे

श्रीमती रेखा विश्वास पाटील

(१०) अग्नीशमन व विद्युत विशेष समिती

श्रीमती मायाताई चिंतामण ईवनाते

श्री तुषार रविन्द्र लारोकर

श्री. अमोल नानाजी शामकुळे

श्री.बाबाराव अजाबराव तायडे

श्री.लखन सुमेरा येरवार

श्री संजय रामचंद्रजी अवचट

श्रीमती प्रगती रोहीत यादव

सिराज अहमद अन्सारी

श्रीमती सायमा नाज फैयाज कुरेशी

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved