Breaking News

ब्रम्हपुरी येथील फसवणूक प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

*माहिती असल्यास त्वरीत पोलिस प्रशासनला देण्याचे आवाहन*

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी येथे नोंद असलेल्या फसवणूक प्रकरणातील दोन फरार आरोपींचा शोध सुरू असून, नागरिकांनी याबाबत काही माहिती असल्यास पोलिस प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.याबाबत फिर्यादी सीमा संजय डोंगरे (वय 47 वर्ष, रा. वडसा, जि. गडचिरोली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मोहन बिसन गजबे (रा. ब्रम्हपुरी), सुहास महादेव दुधे (रा. वानाडोंगरी, नागपूर) व मिना प्रविण गाडेकर (रा. टिटवाडा, ता. ठाणे) यांनी संगनमत करून कमी व्याजदराचे व दीर्घ मुदतीचे 50 कोटी रुपयांचे कर्ज सीएसआर फंडातून मिळवून देण्याचे आमिष दाखविले.

या आमिषाच्या बदल्यात 50 कोटी रुपयांच्या कर्जाकरिता 1 टक्का स्टॅम्प ड्युटी म्हणून 50 लाख रुपये घेण्यात आले. आरोपींनी फिर्यादी व इतर लघु व्यावसायिकांकडून स्वतःच्या बँक खात्यात वेळोवेळी एकूण 60 लक्ष 96 हजार रुपये स्वीकारले; मात्र कर्ज न देता फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सदर तक्रारीवरून 26 जानेवारी 2024 रोजी पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर मार्फत सुरू आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुहास महादेव दुधे, मिना प्रविण गाडेकर हे फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे.सदर आरोपींबाबत नागरिकांना माहिती असल्यास पोलिस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर (फोन क्र. 07172-273258, 264702) किंवा तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर (मो. क्र. 9359258365) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved