Breaking News

चिमूरात भारतीय बौद्ध महासभेचे विविध कार्यक्रमाचे आयोजन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा स्थापित दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) शाखा चिमुर च्या वतीने दि. 8 व 9 येथील चिमूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलें आहे.

8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता भारतीय बौद्ध महासभा चंद्रपुर जिल्हा शाखा अध्यक्ष विजयाताई रामटेके यांचे हस्ते कार्यक्रमाचे उ‌द्घाटन होईल. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय महासभा महिला विभाग तालुका अध्यक्ष अॅड. संजीवनी सातारडे राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्रीय शिक्षिका वनमालाताई रामटेके, ताई मेश्राम, प्रा. जोत्सना सिंगणजुडे, अॅड. डि.के. नागदेवते उपस्थित राहणार आहे. उ‌द्घाटनानंतर आदर्श व्यक्तीमहत्व या विषयावर थोर महापुरूषाच्या वेशभुषा करून दोन ओळी वक्तव्य करणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यानंतर माता रमाई यांच्या जिवनावर “मी रमाई बोलतो” हा एकपात्री प्रयोग विजयाताई रामटेके सादर करतील.

दि. 9 फेब्रुवारी रोजी एकल गित गायण, समुह गायण स्पर्धा होईल, त्यानंतर नृत्य स्पर्धा झाल्यानंतर समारोपीय कार्यक्रमाला विजयाताई रामटेके अॅड.डि.के. नागदेवते, भारतीय बौद्ध महासभेचा तालुका सचिव सरिता अनिल राऊत, उपाध्यक्ष पुष्पा राउत, केंद्रीय शिक्षिका चंद्रकला गायकवाड, प्रा. विशाखा कराडे, केंद्रीय शिक्षिका शितल सोरदे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या संदर्भात भारतीय बौद्ध महासभेच्या महिला तालुका अध्यक्षा अॅड. संजीवनी सातारडे यांनी सांगीतले की, दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा ही संस्था तमाम बौध्दांची मातृसंस्था असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या संस्थेच्या एकूण २६ राज्यात शाखा आहेत. संस्थेच्या वतीने २४ प्रकारच्या शिबीराचे आयोजन करण्यात येते.

सर्वांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवर उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर, समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर, श्रामणेर शिबीर, बौध्दाचार्य शिबीर, बाल संस्कार शिबीर, अंधश्रद्धा निर्मुलन शिबीर इत्यादी शिबीरांचे आयोजन करण्यात येते. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला विज्ञानवादी, अंधश्रध्दा मुक्त, व्यसनमुक्त, आदर्श समाज निर्माण करणे, बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार करणे, बौध्दांचे कार्यामध्ये पारदर्शकता व एकसूत्रीपणा निर्माण करणे या करीता बुध्दविहारांची निर्मीती करणे व बौध्द धम्म परिषद व धम्मदिक्षा सोहळे घेणे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे काळाची गरज आहे.

गाव तिथे शाखा, शाखा तिथे सैनिक निर्माण करणे, सावित्री, जिजाऊ, फातिमा, माता रमाई यांच्या जन्म जानेवारी- फरवरी येतो, त्यांच्या जयंतीचे औचित्य साधुन त्यांचा त्याग व संघर्षाची जाणीव करून देण्यासाठी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. समाजात अनेक प्रकारचे कलावंत असतात, त्या कलाकारांना संधी मिळावी. त्यादृष्टीने दोन दिवसीय कार्यक्रम घेण्यात येत आहे.कार्यक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन सुरक्षा अंबादे, विना काळे, मनोज राउत, आकाश भगत यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved