Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
*बनावट ओळखपत्रापासून सावध राहण्याचे आवाहन*
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) जिल्हा कामगार सुविधा केंद्र तसेच तालुका कामगार सुविधा केंद्रामार्फत नि:शुल्क वितरीत करण्यात येते. पंरतु काही व्यक्ती दलालांमार्फत पैसे घेऊन बनावटी ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) दिले जात असल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत. करीता कोणत्याही बांधकाम कामगारांनी सदरील व्यक्ती /दलाला मार्फत बनावटी ओळखपत्र न घेता जिल्हा कामगार सुविधा केंद्र तसेच तालुका कामगार सुविधा केंद्रातून आपले ओळखपत्र (स्माट कार्ड) घ्यावे.

सदर ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) हे निःशुल्क असल्याने कोणाही व्यक्तीस /एजेंट यांना पैसे देऊ नये. तसेच पैशांची मागणी करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, असे आवाहान सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय यांनी केले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना