Breaking News

अखेर दहा दिवसांनी बादलच्या हत्येचे रहस्य आले समोर

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात *

* चंद्रपुर पोलीसांची अतुलनिय कामगिरी *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – चिमूर तालुक्यातील भिसी येथील सौ. गिता ज्ञानेश्वर मेश्राम यांनी तक्रार दाखल केली कि दिनांक १७/०१/२०२६ रोजी १०:४५ वाजताच्या सुमारास मुलगा बादल ज्ञानेश्वर मेश्राम वय २२ वर्ष हा उमरेड येथुन सर्विसींग ला टाकलेली गाडी घेऊन येतो असे म्हणुन घरुन निघुन गेला असता तो घरी परत आला नाही. या तोंडी रिपोर्ट वरून भिसी पोलीस स्टेशन येथे दिनांक १९/०१/२०२६ रोजी मिसिंग क्र. ०३/२०२६ प्रमाणे नोंद करण्यात आली होती.

सदरची मिसिंग चौकशीत असतांना चौकशी दरम्यान असे निष्पन्न झाले की, यातील आरोपी नामे (०१) देवानंद गोवर्धन श्रीरामे, वय ४० वर्ष, रा. मिनझरी, ता. चिमुर, नी आरोपी क्र. (०२) आरीफ उस्मान खॉ पठाण, वय-३२ वर्षे रा. नेताजी वार्ड चिमुर, हल्ली मु. मिनझरी, ता. चिमुर आरोपी क्रमांक. (०३) सौरभ सुभाष चौधरी, वय-२२ वर्ष, रा. मिनझरी, ता. चिमूर यांना तुम्हाला मालामाल करुन टाकतो फक्त माझे एक काम करा भिसी येथील बादल मेश्राम याला ठार मारु लागा यानंतर त्यांनी बादल ज्ञानेश्वर मेश्राम, यास खडसंगी येथे बोलावुन तुला आश्रम मध्ये महाराजांकडे नेऊन फुक मारण्याचे पुडी देतो ती पुडी घेऊन तुला आवडणाऱ्या मुलीवर टाक असे पटवुन फुस लावुन खडसंगी वरुन आरोपी क्र. (०१) चे शेत असलेल्या मुरपार मिनझरी जंगल शिवारात घेऊन जाऊन आरोपी क्र. (०१) याने मृतकास सांगीतले की “तु खाली बसुन डोळे मिटवुन तुझ्या मनात असलेल्या मुलीचे नाव मनातल्या मनात घेऊन पडुन असलेले ०५ दगड उचलुन खिशात टाक तुझ्या मनातली पोरगी तुला भेटेले” असे सांगीतल्याने बादल हा खाली बसुन डोळे बंद करुन खाली पडुन असलेले दगड उचलत असतांना आरोपी क्र. (०१) हा बादल मेश्राम याचे पाठीमागुन जाऊन खिशातुन नायलॉन दोरी काडुन बादल याचा गळा आवळला तेव्हा मृतक बादल हा आरोपी देवानंद याने श्रीरामे याला दादा मला काऊन मारतो असे विचारले असता देवानंद हा बादल यास बोलला की, तुच माझ्या जिवणातला सर्वात मोठा अडथळा आहेस माझ्या जिवनाचे तुच वाटोळे करत आहे. असे बोलत असतांना आरोपी क्र. ०२ व ०३ ने मृतक बादल मेश्राम याचे दोन्ही पाय व हाथ पकडुन जिवानिशी ठार मारले.

त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतकाचे प्रेत जंगलातील नाल्यात खड्डा खोदुन पुरुन टाकले. सदर गुन्हयाचा सुगावा लागु नये व आपले नाव उघड येऊ नये म्हणुन मृतकाचे मोटार सायकल व मोबाईल याचा घटनास्थळावरुन आरोपी क्र. (०१) ने व आरोपी क्र. (०२) व (०३) ला उमरेड येथे ठेऊन येण्यास सांगीतले.त्यानुसार आरोपी क्र. (०२) व (०३) यांनी उमरेड येथे आर के वॉईन शॉपी समोरील रस्त्यालगत मो.सा. ठेवली व मोबाईल धांडे हॉस्पीटल समोरील रस्त्याचे बाजुला फेकुन देऊन कुणीही गुन्हा केला नाही अशा प्रकारे अर्विभावात गावात वावरत होते. सदर मृतकाचे प्रेत आरोपीने दाखविलेल्या जागेवरुन तहसिलदार चिमुर यांचे समक्ष पुरलेले प्रेत बाहेर काढुन त्याचे नातेवाईकांकडुन ओळख पटवून घेतली. सदर गुन्हा उघड करण्याकरीता उमरेड येथील सिसिटीव्ही कॅमेरे व आरोपी क्र. (०१) याचे मृतकासोबत झालेले कॉलवरुन तसेच गोपनिय माहीतीव्दारे अथक परीश्रम देऊन उघड झाला.

पुढील कारवाई पोलीस अधिक्षक चंद्रपुर मुम्मका सुदर्शन अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर अमोल काचोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे ठाणेदार पो.स्टे. भिसी, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि रविंद्र वाघ, पोउपनि भारत थिटे, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा नितिन कुरेवार, पोहवा नितिन सावे, प्रसाद धुलगुंडे, पोअं हिरालाल गुप्ता, पोअं सतिश झिलपे, पोअं मंगेश चौधरी, पोलीस स्टेशन चिमुर अधिकारी अंमलदार व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपुर यांनी पार पाडली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved