Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- राळेगांव तालुक्यातील धानोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची (SMC) नवीन निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी संजय लक्ष्मणराव कारवटकर यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी राणी संजय मेश्राम यांची बिनविरोध निवड झाली आहे.शाळा व्यवस्थापन समिती ही बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ अंतर्गत स्थापन केली जाते. या समितीत पालक, शिक्षक आणि स्थानिक प्रतिनिधींचा समावेश असतो. समिती शाळेच्या दैनंदिन व्यवस्थापनापासून ते शाळा विकास आराखडा तयार करणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करणे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे यापर्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडते.धानोरा येथील ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा गावातील प्रमुख शैक्षणिक संस्था असून, येथे प्रामुख्याने ग्रामीण व गोरगरीब मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण दिले जाते.
ग्रामीण भागातील अनेक शैक्षणिक अडचणी लक्षात घेता, नवनिर्वाचित अध्यक्ष संजय लक्ष्मणराव कारवटकर यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या सभेच्या अध्यक्ष पदी शाळेचे मुख्याध्यापक विजय लांबट यांच्या मार्गदर्शनात पार पडली, या नविन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष संजय लक्ष्मणराव कारवटकर, उपाध्यक्ष राणी संजय मेश्राम,सदस्य रमेश कुळसंगे, अविनाश साखरकर, दशरथ बिटे,विलास घोडे,शकर कन्नाके,सौ. मोनाली सुधीर हटवार,सुनिता संदिप सुरकर,दिक्षा प्रविण मुन,अर्चना किशोर कुमरे,अनिता अनिल कापटे,मनिषा सुरेश किन्हेकर,यांची अविरोध निवड करण्यात आली.गावकऱ्यांनी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उत्साहाने अभिनंदन केले असून, शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शिक्षक संदिप टुले, रत्नमाला धुर्वे, रिना चौधरी, प्रणाली रडके हे उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना