Breaking News

नायलॉन मांजावर चिमूर पोलिसांची मोठी कारवाई

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* नाबालिगाच्या पालकांवर २५ हजार रुपयांचा दंड *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात चिमूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका नाबालिग बालकाकडून चार नायलॉन मांजाच्या रील जप्त करण्यात आल्या आहेत. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता प्रशासनाने संबंधित नाबालिगाच्या माता-पित्यांवर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

प्रशासनाकडून सदर दंडाची रक्कम १५ दिवसांच्या आत भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निर्धारित कालावधीत दंड न भरल्यास महसूल विभागामार्फत वसुली नोटीस बजावून दंडाची वसुली करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ही कारवाई चिमूर पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर पोलिसांनी केली. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक, दुचाकीस्वार तसेच पक्षी व पशूंना गंभीर इजा होण्याच्या घटना वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.

नागरिकांनी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर, विक्री किंवा साठवणूक करू नये, अन्यथा दोषींवर यापुढेही कडक व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही चिमूर पोलिसांनी दिला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved