Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना चिमूर उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- महाराष्ट्र शासनाच्या २९ डिसेंबर २०२५ रोजी घोषित केलेल्या शासन निर्णयामध्ये थोर पुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याबाबत परिपत्रक काढले परंतु या निर्णयांमध्ये जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचा कळस अभंग वाणीतून जगाला मानवता वादाचा संदेश देणारे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या नाव वगळण्यात आले, शासनाच्या या कृतीमुळे वारकरी संप्रदाय कुणबी समाज, ओबीसी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
कृपया शासनाने या विषयाचे गांभीर्य ओळखून परिपत्रकात सुधारणा करावी याकरिता डॉ, विजय गावंडे पाटील मुख्य संयोजक सकल कुणबी समाज सेवा संघ नागपूर, शाखा चिमूर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. गजानन शिंदे, रमेश करारे,विजय पाटील झाडे, अतकरे सर, राजू चौधरी, विनोद ठाकूणकर, सूरज नरुले, तुळशीरामजी महाले, विजय हिवरकर, शालिकराव ढोरे, लहुजी भोयर, प्रफुल डरे आदी सर्व समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना