Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
*अध्यक्ष पदी पंकज मिश्रा तर सचिवपदी नरेश मुंगले*
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- भिसी व्यापारी असोशीएशन ची 8 जानेवारीला येथील राममंदीर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत व्यापारी मंडळाची मागील चार वर्षापासुन कार्यरत असलेली कार्यकारीणी बरखास्त करून नवीन गठीत करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आले. मतदान झाल्यानंतर पंकज मिश्रा यांना भिसी व्यापारी असोशीएशन चे नवीन अध्यक्ष घोषीत करण्यात आले.यावेळी सर्वानुमते नरेश मुंगले यांची सचीव व उपाध्यक्षपदी अनिल शेन्डे यांची नियुक्ती करण्यात आली.नवीन कार्यकारीणीत कोषाध्यक्ष पदावर सुरेन्द्र घरत व महेश रामटेके यांची सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली.

यावेळी कार्यकारीणी सदस्य पदावर अविभाऊ डोये, जगत तांबे, पंकज गाडीवार, विनोद खवसे, सुरेन्द्र मेश्राम, पंकज वर्मा, मुन्ना मुंगले, अक्षय सहारे, श्रीकांत ठोंबरे, नरेश निमजे, राजु राजुरकर, सचीन रेवतकर तसेच मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त प्रा.ज्ञानेश्वर शिरभय्ये, धनराज मुंगले, सुरेश बैनलवार यांची नियुक्ती करण्यात आली.भिसी व्यापारी असोशीएशन च्या कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ एक वर्षाचा राहील असे सर्वानुमते ठरवीण्यात आले. बैठकीला उपस्थीत व्यापारी बांधवांनी नवनियुक्त पदाधीकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
………………………………………..
कोरोणा काळात भिसी व्यापारी असोशीएशन च्या अध्यक्ष पदाची जवाबदारी उत्तमरित्या सांभाळली. त्यावेळी व्यापारी बांधवांच्या हितासाठी कार्य केले. भिसी येथील व्यापारी बांधवांनी परत माझ्यावर अध्यक्ष पदाची जवाबदारी दिली. यावेळी सुध्दा व्यापारी बांधवांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. – ” पंकज मिश्रा अध्यक्ष व्यापारी असोशीएशन भिसी “
ज्वाला समाचार सच का सामना