Breaking News

चिमूर शहरात संशयास्पद आढळून आला मृत्यूदेह

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

* अवघ्या तीन तासात पोलीसांनी खुनाच्या गुन्हयात आरोपींना केली अटक *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- आज दिनांक ०४/०१/२०२६ रोजी सकाळी ०६:०० वाजता च्या सुमारास नेहरू विद्यालयाच्या प्रांगना लगत असलेल्या वॉल कंपाऊंड जवळ संशयास्पद मृतदेह आढळून आला. बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी जमायला सुरवात झाल्याने याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशी करीता शवविच्छेदन करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की श्रीमती उशा प्रभाकर उताने, वय ५० वर्ष, रा. तनिस कॉलनी ठक्कर वार्ड चिमूर यांनी तक्रार नोदविली कि, नेहरु शाळा चिमुर येथे त्यांचा मुलगा आकाश प्रभाकर उताने, वय ३१ वर्ष, रा. तनिस कॉलनी ठक्कर वार्ड चिमूर याचे डोक्यावर कोणीतरी मारहान केल्याने त्यांचा मुलगा हा जखमी होवुन मृत अवस्थेत पडलेला आहे अशी माहिती पोलीस स्टेशन चिमूर येथे दिली.

पोलिसांनी प्रथम दर्शनी घटणास्थळाचे निरीक्षण केले असता मृतकाने आरोपींना दारु पिवुन शिवीगाळ केली त्यामुळे आरोपी व मृतक यांच्यात झटपट होवुन आरोपीने मृतकाचा खुन केल्याचे दिसुन आले. त्यावरुन पोलीस अधिक्षक सा. मुमक्का सुदर्शन सा., भा. अपर पोलीस अधिक्षक सा. ईश्वर कातकडे सा., उप विभागिय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली आरोपीचे शोध घेण्यासाठी पो.स्टे.स्थरावर सपोनी. ताळीकोटे, पोउपनि. देरकर, पोहवा. सचिन साठे, पोहवा. प्रमोद पढाल, पोहवा. प्रमोद पिसे, पोहवा. डोनु मोहुर्ले, पो.अं. सचिन खामनकर , पोअं. रोहित तुमसरे, पोअं. फाल्गुन परचाके, पोअं. रुपेश शामकुळे, पोअं. विकास बारसागडे, पो.अं. गणेश वाघ, पो.अं. सोनु येलकुचेवार यांना रवाना करण्यात आले. सदर पथकाने गुन्हयातील आरोपी १)सुजल विलास सोनवाने वय २० वर्ष रा.नेताजी वार्ड चिमूर, २)छगण मोहन दिगोरे वय २७ वर्ष रा. नेताजी वार्ड चिमूर, ३)अनिकेत शेषराव साखरकर वय २४ वर्ष रा.नेताजी वार्ड चिमूर यांचा अवघ्या तिन तासात शोध घेवुन गुन्हा उघडकिस केला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved