Breaking News

एम.डी. पावडर व मोबाईल असा २,८४,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

 

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

 

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- आज दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे रयतवारी कॉलरी चंद्रपूर परिसरात अवैध अंमली पदार्थ विक्री संबंधाने छापा घालुन एका विधी संघर्ष बालकाचे ताब्यातुन एम. डी. अमली पदार्थ पावडर ४८.१६० ग्रॅम वजनाचा किंमत अं. २,४०,०००/- रु. एक जुना वापरता मोबाईल किं. अं. ५,०००/- रु आणि रोख रक्कम ३९,०००/- रु. असा एकुण २,८४,०००/- रुपयाचा माल मिळुन आल्याने नमुद विधी संघर्ष बालक आणि पाहिजे असलेले आरोपी नामे सैफुउद्दीन सिद्दीकी रा. रयतवारी कॉलरी चंद्रपूर व श्रीकांत डुंबरे रा. वाठोडा, नागपूर यांचेविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक ११०१/२०२५ कलम ८ (क), २२ (ब), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा नितीन साळवे, नितीन कुरेकार, सुभाष गोहोकार, सचिन गुरनुले, प्रमोद कोटनाके परवरिश शेख, पोअं. शशांक बादामवार, प्रसाद धुळगुंडे चासफौ प्रमोद डंबाारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अमली पदार्थाचे सेवन करणे, अमली पदार्थ जवळ बाळगणे किंवा अमली पदार्थ खरेदी-विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे, असे करतांना कोणी आढळल्यास चंद्रपूर पोलीस दलाचे 7887890100 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर माहिती देवुन चंद्रपूर नशामुक्त करण्यास पोलीसांना सहकार्य करावे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved