Breaking News

पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.

विशेष प्रतिनिधी – नागपूर

नागपूर, ता. 23 :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकार्याकडे एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या 10 झोन कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिका-यांची नियुक्ती केली आहे. येत्या 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी मंगळवार पासून (ता. 23) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील 10 झोनमध्ये संबंधित प्रभागातील इच्छुक उमेदवार निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इच्छुकांना ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी मात्र 10 झोनमधील निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

येत्या 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या अर्जांची छाननी येत्या 31 डिसेंबरला होणार आहे. उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत 2 जानेवारी 2026 राहणार आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved