Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.
Jwalasamachar.in.
* अधिकारी निवडणूकीच्या कामात व्यस्त-अवैध रेती तस्कर मात्र मस्त *
* पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर येणार तरी केव्हा? *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीचा उपसा करून नदी पात्राच्या बाजूला रेतीचा साठा जमा करून ठेवला जातो आणि रात्रीच्या अंधारात रेती चोरटे बिनधास्त पणे करतात रेतीची वाहतूक त्यामुळे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासना बदल जनतेत ठिक – ठिकाणी चर्चा रंगली आहे.चिमूर तालुक्यासहित चिमूर शहरातुन ३५३ ई राष्ट्रीय महामार्गावर रात्री १० ते ११ वाजल्यानंतर सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा धुमाकुळ असतो शहरातील प्रत्येक चौकात सी.सी. टि.वी. कॅमेरे बसविण्यात आले आहेत तरी सुद्धा रेती चोरट्यांची मुजोरी बघा यांना अभय तरी कुणाचे असा प्रश्न जनतेत निर्माण झाला आहे.

भरधाव वेगाने चालणाऱ्या या रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने कित्येक मजुरांनी आपला जिव सुध्दा गमविला आहे तरी देखील याकडे प्रशासनाचे अधिकारी यांनी पाठ फिरवली आहे. वरीष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का?.

रात्रीच्या अंधारात भरधाव वेगाने चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजाने नागरीकांची झोप उडाली आहे. सध्या चिमूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक असल्याने अधिकारी निवडणूकीच्या कामात व्यस्त आहे म्हणून अवैध रेती तस्करी करणारे मात्र मस्त. रात्रीला पोलीसांची गस्त करतात तरी काय मग चौकाचौकात लागलेले सी.सी.टी.वी. कॅमेरे शोभेची वस्तू बनली की काय अशी चर्चा नागरिक करतांना दिसत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना