Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in
*अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांत व चिमूर शहरात चर्चेचा विषय *
* भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला धक्का *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी फिशरमेन जिल्हा अध्यक्ष व चिमूर तालुका सरचिटणीस या पदाचा विलास मारोती मोहिनकर तसेच चिमूर शहर काँग्रेस मिडिया प्रमुख शाफिक अ.कदिर शेख उर्फ पप्पुभाई यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर चिमूर शहरात तथा जिल्ह्यात मोठया प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे.

वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आणि विरोधकांचा विरोध करीत पक्षाची भूमिका मांडण्याचा कार्य नियमित करीत असतांना देखील पक्षाने डावलने असा प्रकार आज चिमूर नगर परिषद निवडणुकीत दिसून आला यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी अचानक पक्षाला रामराम ठोकण्याचा कार्यक्रम राबवित आहेत तर यास जबाबदार तरी कोण? याकडे काँग्रेस पक्षाचे व जनतेचे लक्ष लागले आहे.या सर्व प्रकारामुळे अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठावान पणे काम करणारी कार्यकर्ते यांना पक्ष डावलत असेल तर कार्यकर्ते व पदाधिकारी करणार तरी काय?.
ज्वाला समाचार सच का सामना