Breaking News

ब्रम्हपुरी परीसरातील वाघाने हल्ला केल्याचा तो व्हिडीओ बनावट

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

* खोट्या अफवा पसरविणाऱ्या विरुध्द होणार गुन्हे दाखल *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी वनविभागातील वनविश्रामगृह येथे दिनांक ३१.१०.२०२५ रोजी सायं. १८.४२ वाजता वाघाने हल्ला करून केलेल्या एका इसमाच्या हत्येचा व्हिडीओ (Video) म्हणून एक दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. याबाबत असे स्पष्ट करण्यात येते की, चंद्रपूर वनवृत्तातील ब्रम्हपुरी वनविभागात अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही.

तसेच, या व्हिडीओच्या माध्यमातून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा आणि सत्यविरहित अफवा पसरविण्याचा प्रयत्र काही समाजकंटकांकडून करण्यात येत आहे. अलीकडील काळात ब्रम्हपुरी वनविभागात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढल्या असल्याचा गैरफायदा घेत समाजकंटकांकडून जनतेत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.

सदर व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence – Al) साहाय्याने बनविण्यात आलेला असून तो पूर्णपणे बनावट आहे. या व्हिडीओची निर्मिती व प्रसारण करणाऱ्या व्यक्तीं विरुध्द वनविभागाने गंभीर दखल घेतली असून, संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

जनतेस पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारच्या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओंवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारची माहिती आढळल्यास तात्काळ जवळच्या वनविभाग अथवा पोलिस विभागास कळवावे व सहकार्य करावे.

*आर.एम.रामानुजम मुख्य वनसंरक्षक,(प्रा.) चंद्रपूर वनवृत्त, चंद्रपूर कार्यालय*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

26 जुन पासुन शाळा सुरू करा – कवडू लोहकरे यांची मागणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved