Breaking News

वाघाने हल्ला करून महिलेस केले ठार – परीसरात भितीचे वातावरण

Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar
Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar Jwalasamachar.in

* नागरीकांनी तब्बल नऊ तास ठेवला रस्ता जाम *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

गोंडपिपरी :- चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यामुळे दहशत निर्माण झाली असून सर्वत्र परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपीपरी येथे अलका पेंदोर यांच्यावर वाघाने हल्ल्या करून ठार केल्यानंतर गोंडपिपरीमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले. परिसरातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि तब्बल नऊ तास अहेरी-चंद्रपूर हा मुख्य रस्ता पूर्णपणे अडवून धरला.

आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून तीव्र निषेध केला आणि चक्काजाम आंदोलन सुरू केले.गोंडपिपरीची संपूर्ण बाजारपेठही आंदोलकांनी पूर्णपणे बंद ठेवली. संतप्त जमावामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे होती.त्यामुळे घटनास्थळी दंगा नियंत्रक पथक आणि अतिरिक्त पोलीस दल बोलवण्यात आले.

* नऊ तासांनंतर प्रशासनाचे यश *

दिवसभर अनेकदा प्रशासनाकडून समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला, परंतु आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर (वाघाचा तात्काळ बंदोबस्त आणि कुटुंबाला नुकसान भरपाई) ठाम होते. काही वेळा पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला, पण त्याचा आंदोलकांवर कोणताही परिणाम झाला नाही.

सायंकाळी ५ वाजता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का आणि उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून, त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved