jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी कला उत्सवाचे आयोजन केले जाते.याच कला उत्सवाची प्रथम पायरी म्हणजे तालुकास्तर.पंचायत समिती चिमूर तर्फे दि.29/08/2025 रोजी तालुकास्तरीय कला उत्सवाचे जनता विद्यालय नेरी येथे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध कलाप्रकाराचा समावेश होता. अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा चिमूर येथील विद्यार्थिनींनी गायन एकल, गायन समूह, नृत्य एकल, नृत्य समूह, द्विमितीय दृश्यकला आणि भूमिका अभिनय या स्पर्धामध्ये प्रथम पारितोषिक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.
ज्यामध्ये क्षमा रामटेके, अक्षरा बोरकर,रुचिका नगराळे,अंतिक्षा मेश्राम, ख़ुशी शंभरकर, श्वेता लिंगायत,रक्षिता मेश्राम,त्रिशा लभाने, मेघना बारसागडे, अंजुम दहिवले,तृप्ती मालखेडे,चैतन्या मालखेडे, अक्षरा पाटील, इशिका शेंडे या विद्यार्थिनींनी उपरोक्त कलाप्रकारांमध्ये प्रथम पारितोषिक पटकवत जिल्हास्तर गाठलेला आहे.शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता खोब्रागडे यांनी विजयी विद्यार्थिनींचे आणि मार्गदर्शक शिक्षक सचिन भरडे यांचे कौतुक केलेले आहे.समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे, शाळेतील सर्व शिक्षक वृंद खापर्डे, पुलेनवार, गजभिये,काळे,श्रीमती बोरकर, महाजन,नेऊलकर, घ्यार, धात्रक आणि बाह्यस्रोत कर्मचारी यांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ज्वाला समाचार सच का सामना