Breaking News

फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह संपन्न

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* “आधा घंटा रोज, फिटनेस का डोस” चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमानाने *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चंद्रपूर :- भारत सरकारच्या क्रिडा विभागाच्या व “फिट इंडिया” मोहिमे अंतर्गत आज दिनांक २६ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ०७:०० वाजता पटेल हायस्कुल समोर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पासुन ते दुर्गापूर रोड- प‌द्मापुर गेट ते पोलीस सभागृह तुकूम पर्यत सायकलयॉन चे आयोजन करण्यात आले होते.

सदर सायकलथॉन जिल्हा पातळीवरील पोलीस अधिकारी व अंमलदार सह पोलीस कुटूंबियांनी सहभाग नोंदविला असुन जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत माध्यमिक शालेय विद्यार्थी आणि चंद्रपूर शहरातील Go Green Cycle Group चे सदस्यांनी सुध्दा सहभाग नोंदविला आहे.

याद्वारे नागरिकांना आव्हाण करण्यात येते की, सदर सायकलथॉन चा मुख्य उद्देश हा Say No To Drug Dose आधा घंटा रोज, फिटनेस का डोस या संदेशाचा प्रसार करणे व फिटनेसला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविणे हा आहे.

सदर सायकलथॉन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली असुन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी हिरवी झेंडी दाखवुन सदर सायकलयॉनची सुरुवात करुन स्वतः सुध्दा सहभाग नोंदविला असुन त्यांच्या समवेत जिल्हयातील प्रतिष्ठीत डॉक्टर मंगेश गुलवाडे व व्यवसायिक अनिल टहलयानी, संदीप बच्चुवार शाकीर उकाणी, आबीद भाई, अक्षय राउत, धर्मा गावंडे आणि सायकल क्लबचे अनेक सदस्यांसह जिल्हा परिषद चंद्रपूर येथील फटींग, विशाल देशमुख व जि.प. माध्यामिक शाळेचे शिक्षक वृंद व विधार्थी-विद्यार्थीनी आणि चंद्रपूर उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, पोनि महेश कोंडावार,प्रविणकुमार पाटील, आसिफराजा शेख, निशीकांत रामटेके, संदीप एकाडे, रापोनि किसन नवघरे, रापोउपनि रासेकर, सपोनि हिमांशु उगले, देवराव नरोटे, अश्विनी वाकडे, पोउपनि संदीप बच्छिीरे, चंद्रकांत पेद्दीलवार सह पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर, रामनगर, दुर्गापूर येथील अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

एसआयआर अंतर्गत 100 टक्के घरोघरी जाऊन होणार मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved