jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* राजारामजी महाराज व कृपारामजी महाराज जोधपूर यांची उपस्थिती *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- श्रीमद् भागवत कथा महोत्सवा निमित्त चिमूर शहरातुन निघाली भव्यदिव्य कलश यात्रा उत्सव. चिमूर चे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज मंदिर येथून कलश यात्राचे आयोजन करण्यात आले. श्रीहरी बालाजी महाराज यांची पुजाअर्चना करून श्रीहरी बालाजी मंदिर पटांगणातुन कलश यात्रेला सुरुवात झाली. विविध भजन दिंड्या व ढोल ताशाच्या गजरात शहरातील मुख्य मार्गाने कलश यात्रा निघाली. या कलश यात्रेला हजारो महिलांनी भारतीय परंपरेनुसार परीधान धारण करुन कलश डोक्यावर घेऊन मार्गक्रमन करीत होत्या.

या कलश यात्रेत भागवत कथा वाचक कृपाराम महाराज व राजारामजी महाराज जोधपूर राजस्थान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्रीमत् भागवत कथा महोत्सवाला आज दिनांक १८/०८/२०२५ पासुन कलश यात्रेने सुरुवात झाली असून श्रीमत् भागवत कथा दिनांक २४/०८/२०२५ पर्यत सुरू राहणार असून सर्व चिमूर परीसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार मितेश भांगडीया , आमदार किर्ती कुमार भांगडीया, श्रीकांत भांगडीया व समस्त भांगडीया परीवारा तर्फे करण्यात आले आहे.
ज्वाला समाचार सच का सामना