jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
हिंगणघाट :- आज दिनांक 16 /8 /25 रोजी कुलस्वामिनी बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था हिंगणघाट येथील विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय व सक्सेस गायडन्स पॉईंट स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगणघाट येथे पोलीस स्टेशन हिंगणघाट येतील ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता हेलोंढे यांनी अमली पदार्थ सेवन केल्यामुळे होत असलेल्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अमली पदार्थ सेवन न करण्याबाबत सूचना दिल्या तसेच त्यांनी स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोलीस हवालदार प्रवीण बोधाने यांनी विद्यार्थ्यांना डायल 112 हेल्पलाइन बाबत माहिती दिली. व सायबर गुण्याबाबत होत असलेल्या फसवणुकीबाबत माहिती देऊन सायबर गुन्हेगारापासून कशा पद्धतीने वाचायचे याबाबत मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य योगेश वानखेडे व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस अंमलदार प्रमोड व विद्यार्थी सुरज मुजबले यांनी केले..
ज्वाला समाचार सच का सामना