jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जि. प. शाळा चहांद येथे स्वतंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जि. प. शाळेची प्रभातफेरी येथील स्थानिक चौकातील ध्वजारोहण करून ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण करण्यात आले. महामानवाच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सचिव सौ वंजारी मॅडम गावातील सरपंच रुपाली ताई राउत उपसरपंच सुदर्शना ताई कांबळे व समस्त ग्रामपंचायत सदस्य तलाठी अमोल मोरे,तंटामुक्ती अध्यक्ष विनोद बोरकुटे नंतर प्रभात फेरी गावातून “स्वातंत्र्य दिन चिरायू हो ” च्या घोषणा देत जि. प. शाळेत आगमन झाले.यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करण्यात आले ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर बोरकुटे उपाध्यक्ष शशिम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

झेंड्याला सलामी देत राष्ट्रगीत घेण्यात आले नंतर शाळेतील छोट्या छोट्या मुला मुलींनी देशाच्या स्वातंत्र्यं साठी लढलेल्या विरांचे कार्य उपस्थित पाहुण्यासमोर विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे सांगितले,व देश भक्ती गीत, कवायत सादर करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे सरपंच, उपसरपंच,सदस्य निखिल शेळके, प्रमोद येडे, सौ. कविताताई चांदेकर, सौ. चामाटे ताई, व आरोग्य सेविका सौ. राजगडकर मॅडम, विशेष उपस्थिती चारुदत पाटील, राहुल पाटील, रामभाऊ मेश्राम, गुलाबराव चांदेकर, शंकरभाऊ राऊत, शरदभाऊ कांबळे आशा वर्कर प्रभावती चांदेकर आरोग्य सेवक मेश्राम, अंगणवाडी सेविका सौ. हिवरे मॅडम, आत्राम मॅडम, मदतनिस सौ खैरे, सौ ठमके, शाळेतील मुख्यद्यापक खेमदास चिमणे शिक्षक वृंद जयाताई वाघमारे, अमृता धोंटे, खेरे सर, स्वप्नील सिडाम व सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य हजर होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. जयाताई वाघमारे यांनी केले तर आभार जि. प. शाळा चहांद येथील मुख्याध्यपाक खेमदास चिमणे यांनी केले
ज्वाला समाचार सच का सामना