jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- अंगदान दान सप्ताह निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय चिमूरच्या वतीने जनजागृतीसाठी 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आयोजन करण्यात आले असून अंगदानाचे महत्व पटऊन देण्यासाठी शैक्षणिक सत्रे.चर्चासत्र. जनजागृती रॅली. वैद्यकीय मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ अश्विन अगडे यांनी दिली.

या उपक्रमाचा उद्देश समाजात अवयव दानाविषयी सकारात्मक विचारसरणी निर्माण करणे आणि गरजूना जीवनदान मिळऊन देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान वैद्यकीय अधीक्षक डॉ.अश्विन अगडे यांनी केले.या वेळी डॉ राजेश शेंडे. देवानंद वासनिक.महाबळे उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना