Breaking News

राधा कृष्णच्या वेशभूषेत बाल गोपालांची धमाल प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

* चिमूर शहरात रंगला लिटल राधा कृष्ण सोहळा *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- आमदार कीर्तिकुमार  भांगडिया यांच्या सहकार्याने टीम राधा कृष्ण चिमूर यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लिटिल राधा कृष्ण स्पर्धेत ५ ते १५ वयोगटातील मुलांनी राधा कृष्णाचे रंगभूषा सादर करत केली धमाल मस्ती.श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या सहकार्याने टीम राधा कृष्णा यांनी अभ्यंकर मैदान चिमूर येथे जिल्हास्तरीय लिटिल राधा कृष्ण स्पर्धा आयोजित केली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू देवतळे होते. प्रमुख पाहुणे उर्मिला वासनिक, प्रशांत चिडे, श्रेयस लाखे उपस्थित होते. लिटिल राधा कृष्ण स्पर्धेत चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यातील सहभागी झाले होते.

कार्यक्रमात ५ ते १५ वयोगटातील मुलांनी भाग घेतला. ही स्पर्धा दोन श्रेणींमध्ये आयोजित करण्यात आली होती. ५ ते ९ वयोगटात राधाच्या भूमिकेसाठी चैताली संजय स्वान आणि कृष्णाच्या भूमिकेसाठी श्राविल बोरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. १० ते १५ वयोगटात राधा च्या भूमिकेत पारुल केमये आणि कृष्णाच्या भूमिकेत तनुष कोरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धकांना पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम, उर्मिला वासनिक, बाळू पिसे, श्रेयस लाखे, बंटी वनकर आणि अमित जुमडे यांचे हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.लिटिल राधा कृष्णा स्पर्धेचे परीक्षण नॅशनल इंडियन ऑइडल विजेता वैभव गुप्ता यांनी भगवान कृष्णाच्या वेशभूषेत केले होते आणि त्यांच्यासोबत सुमित तिलोकाणी आणि शिवम गणवीर यांनी परीक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकर परेश यांनी केले. तेजस मिसार, गुरुदास ठाकरे, मनीषा घाडगे, माधुरी कावरे, ज्योती केमये, गौरी बनकर, सतीश ठाकूर आणि राधा कृष्णाच्या संपूर्ण टीमने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved