jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यात एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा केला जात असून आज महसूल सप्ताह चा तिसरा दिवस असून आज तीन ऑगस्ट 2025 रोजी चिमूर तालुक्यातील खडसंगी ,चिमूर ,वडाळा पैकु, गोंदेडा ,नेरी ,जांभुळगाट ,शंकरपूर, भिशी, आंबोली, मासळ या दहा मंडळामध्ये पांदण रस्त्याचे दुतर्फा झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.चिमूर तालुक्याचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांच्या हस्ते रेंगाबोडी ते जामणी जाणाऱ्या पांदन रस्त्याचे दुतर्फा झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला . वृक्षारोपणाच्या कार्यक्रमावेळी मंडळ अधिकारी खडसंगी, ठाकरे ,मडावी ,कामडी, ग्राम महसूल अधिकारी तसेच रेंगाबोडीचे सरपंच ग्रामसेवक व नागरिक उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना