Breaking News

प्रहार शेतकरी संघटना तसेच प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जवळपास दीड तास रास्ता रोको आंदोलन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :- दिनांक 26 जुलै 2025 वार शनिवार या बाबत सविस्तर वृत्त असे की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्यात येऊन त्यांचा सातबारा उतारा कोरा करण्यात यावा दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मंजूर करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी दिव्यांगांना घरकुल योजनेसह इतर शासकीय सोयी सवलतींचा लाभ मिळावा आदी प्रमुख मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी शेवगाव तालुका प्रहार शेतकरी संघटना तसेच प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने शेवगाव शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दिनांक 25 जुलै रोजी गुरुवारी जवळपास दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख रस्त्याच्या सर्वच बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या प्रशासनाच्या वतीने शेवगांवचे नवनियुक्त तहसीलदार आकाश दहाडदे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले त्यानंतर पुकारण्यात आलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित केल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

प्रहार चे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशान्वये पार पडलेल्या रास्ता रोको आंदोलनात प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मी देशमुख जिल्हा संपर्कप्रमुख गणेश हनवते प्रहार दिव्यांग पक्षाचे तालुकाध्यक्ष तात्यासाहेब गिरगे प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय नाचन अंकुश गोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे किशोर गरंडवाल योगेश हनवते यांच्यासह संदीप गालफाडे बाबासाहेब धाकतोडे सद्दाम सय्यद जनार्दन सुराशे ज्योती दुसंगे बबनबाई काळे बाळासाहेब वाघमारे अनिता मडके सुनीता नाईक सोपान वाघमारे कोंडीराम भोसले आफसर पठाण सुनील काटे मुकुंद सोलाट रुस्तुम शेख ज्योती सुराशे काकासाहेब मडके अस्मिता सरोदे यांच्यासह प्रहार शेतकरी संघटना व प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना प्रहार दिव्यांग संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती देशमुख यांनी माजी आमदार बच्चुभाऊ कडू यांनी गेल्या सहा महिन्यापासून शेतकरी व दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी शासन दरबारी विविध आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठविला आहे. त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने काही मागण्या मान्य केल्या आहेत. आता त्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी होण्याची आवश्यकता व्यक्त करून याबाबत चालढकल दिसून आली तर यापुढे अधिक उग्र आंदोलन पुकारण्यात येईल असा निर्धार व्यक्त केला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved