Breaking News

हिंगणघाटहून आदिलाबादकडे जात असलेली गोवंश जनावरे भरलेली पिकअप जप्त

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

* पोलीस स्टेशन येथे पाच जणांवर गुन्हा दाखल*

  • जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

पांढरकवडा :- पांढरकवडा पोलीस पथक दि. १५ जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, हिंगणघाट येथून आदिलाबादकडे जात असलेल्या एका पिकअप वाहनामध्ये गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेली जात आहेत. या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करत पांढरकवडा ते पाटणबोरी दरम्यान संबंधित वाहनाची शोधमोहीम राबवली. या मोहिमे दरम्यान एक अशोक लेलँड कंपनीची पांढऱ्या रंगाची एम.एच. ३१/एफ.सी.८५९६ क्रमांकाची पिकअप आढळून आली. वाहन थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे निर्दयपणे दाटीवाटीने कोंबलेली आढळून आली. जनावरांना आखूड दोऱ्यांनी बांधण्यात आले होते आणि त्यांना हालचालीसाठी पुरेशी जागाही दिलेली नव्हती. त्यापैकी एक गाय मृतावस्थेत होती.

वाहनात एकूण ११ गायी होत्या. अंदाजे किंमतीनुसार या गायींची एकूण किंमत ५५,००० इतकी आहे. त्याशिवाय घटनास्थळी पोलिसांनी व्हिवो मोबाईल (किंमत ४,०००/-) आणि अशोक लेलँड वाहन (किंमत ११ लाख) असा एकूण ११ लाख ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रणय निरंजन सगुने (१९), रा. नागपूर असे सांगितले. त्याने पोलीसांना दिलेल्या जबानीत सांगितले की, सदर गोवंशीय जनावरे महेश सूर्यभान लोंढे (३५), रा. नागपूर, शाहीद अफजलखान कुरेशी (३०), रा. हिंगणघाट, शक्ती शेषराव कनाके (३८), रा. पाटणबोरी, स्वप्नील कनाके (२५) रा. नागपूर यांच्या सांगण्यावरून आदिलाबादकडे नेत असल्याचे स्पष्ट केले. या घटने प्रकरणी पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संबंधित वाहन व जनावरे ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved