jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- आंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने विविध मागण्या घेऊन चिमूर येथे आंगणवाडी कर्मचारी सभेचे जिल्हा अध्यक्ष इम्रान कुरेशी यांच्या नेतृत्वात भर पावसात चिमूर येथील तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला कायमस्वरूपी कामातील कंत्राटी करणाला मज्जाव, खाजगीकरणाला विरोध, कामगार कायदे बदलले त्यास विरोध, बेकारी हटवा, सार्वजनिक उद्योग विकु नका, रेशन व्यवस्था बळकट करा, समान कामाला समान दाम, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाची शिफारस लागु करा आदी मागण्यांसाठी देशभरातील संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगार ९ जुलैला एक दिवशीय सार्वत्रिक संप करीत आहेत. त्या संपात महाराष्ट्रातील सर्व आंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या आहेत.

आंगणवाडी कर्मचारी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागु करण्यात यावी, एफ. आर.एस.ची सक्ती करण्यात येवु नये,अर्हताप्राप्त सेविकेचे ५५ वर्ष वयोमर्यादा करुन पर्यवेक्षिकेच्या जागा तातडीने भरण्यात याव्यात, चालकाच्या आहाराचा दर ८ रुपये वरून १६ रुपये करावा व स्तनदा गरोदर माता अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा आहाराचा दर दुप्पट करण्यात यावे. समृध्दी आहाराचा दर ६५ पैस्यावरून २ रुपये करण्यात यावा, मानधनाची निम्मी रक्कम पेन्शन म्हणुन देण्यात यावी,आंगणवाडयांना नव्या दराने घरभाडे देण्याचे ठरविले असुन त्याच्या जाचक अटी खूद करून घरभाडे देण्यात यावे, मदतनीसला थेट नियुक्तीसाठी असलेली २ वर्षाची अट खूद करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता.

महाराष्ट्र राज्य आंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून ब त्यांचे प्रश्न सोडवुन राज्यातील आंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावे, अशी आंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी असल्याचे अंगणवाडी कर्मचारी सभेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष इम्रान कुरेशी यांनी सांगितल चिमूर येथील किल्ला मैदान येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली हॊती नंतर पंचायत समिती चिमूर येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पूनम गेडाम यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले नंतर मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळला तिथे सुद्धा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले तिथुन मोर्चा बाल विकास प्रकल्प कार्यालय नागरी प्रकल्प येथे गेला तिथे प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदककर यांना निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला या मोर्चात पोलीस विभागाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ज्वाला समाचार सच का सामना