Breaking News

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नागपूर उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

विशेष प्रतिनिधी – नागपूर

नागपूर, २८ जून २०२५ – उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते नागपूर आज संपन्न झाले.

उच्च न्यायालय दुसरा मजला, बार रूम क्रमांक ६, येथे आयोजित या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे व न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता डॉ. बीरेन्द्र सराफ उपस्थित होते.

वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल पांडे आणि सचिव अ‍ॅड. अमोल एम. जलतारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या बार रूममुळे वकिलांना कामकाजासाठी अधिक सुविधा व अनुकूल वातावरण मिळणार असून, न्यायालयीन व्यवस्थेच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
कार्यक्रमाला उच्च न्यायालयातील न्यायाधीश, न्यायीक अधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved