jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* पूला जवळील खड्डा ठरला अपघातास कारणीभूत *
* सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही *
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील खैरी या गावातून दररोज वरोरा तालुक्यातील एकोना या कोळसा खदानी मधून दररोज कोळशाची वाहतूक सुरू असते. कोळसा वाहतूक करणारे ट्रक या रोडने सुसाट वेगाने चालतात त्यांचे वेगावर नियंत्रण नसते. आजही असाच ट्रक क्रमांक एम एच ३४ बी जी ७८९४ हा एकोना खाण्यातून कोळस घेऊन येत असताना खैरी या गावाजवळील बाळासाहेब खैरकर यांच्या शेताजवळ पुलावरील खड्डा चुकवत असताना हा कोळसा भरलेला ट्रक त्यांचे शेतात पलटी झाला यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र शेतकऱ्याच्या शेतमालाचे नुकसान झाले हे विशेष तसेच ट्रक ड्रायव्हर हा मद्य धुंद अवस्थेत होता त्याने मद्य प्राशन केले होते.

ज्या पुलाजवळ ट्रक पलटी झाला त्या पुलाच्या जवळ मोठा खड्डा पडलेला असून ह्या खड्ड्यामुळेच इथे नेहमी अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र या खड्ड्याकडे मारेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे परिपूर्ण दुर्लक्ष आहे. पलटी झालेल्या ट्रकचे ड्रायव्हरचे नाव मात्र बातमी लिही पावेतो कळू शकले नाही. ह्या रोडनी नेहमी रेतीचे व कोळशाचे भरधाव ट्रक चालतात त्यामुळे केव्हाही अपघात होऊ शकतात तरी बांधकाम विभागाने ह्या खड्ड्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशी वाहन चालक व खैरी ग्रामवश्याकडून मागणी होत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना