jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी *
विशेष प्रतिनिधी – नागपूर
नागपूर :- दि.२० राज्याचे महसूल मंत्री आणि व नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जनसंवाद कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिकांनी निवेदने सादर केली. विशेष म्हणजे दररोज निर्माण होणाऱ्या मुलभूत समस्यासह रोजगार आणि वैय्यक्तिक कामासंबंधी निवेदन देण्यात आली. संबंधित निवेदनाची दाखल घेत उपस्थित अधिकाऱ्यांना नागरिकांचे मुलभूत प्रश्न तात्काळ मार्गी लावत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नियोजन भवन येथे जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. विविध समाजातील युवक , महिला आणि ज्येष्ठ नागरिक जनसंवाद कार्यक्रमात निवेदन घेऊन सहभागी झाले होते.
यावेळी दिव्यांग, वृध्द, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजगारासंबधी युवक- युवतीचे एक एक करत निवेदन स्वीकारत चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रत्येक नागरिकांच्या निवेदनाची दखल घेत असताना त्यांना समस्याबाबत शाश्वत केले.या शिवाय शहरातील अतिक्रमण, पिण्याच्या पाण्याची समस्या रस्ते, कृषी,धार्मिक सांस्कृतिक, क्रीडा, सांस्कृतिक, म्हाडाची घरे आदी क्षेत्रांशी संबंधित निवेदने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोपविण्यात आली. यावेळी ना. श्री बावनकुळे यांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. विविध संस्थाचे प्रतिनिधी आपल्या संस्थेच्या अडचणी घेऊन आले होते, काहींनी निधी साठी तर काहींनी वैद्यकीय मदत मिळावी यासाठी निवेदन दिली.अनेक लोक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन कार्यक्रमात दाखल झाले होते. नागरिकांच्या समस्या जाणून घेत समस्या ऑन द स्पॉट सोडवता याव्यात, हा उद्देश ठेवूनया प्रशासनातील अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, रमेश मानकर आदी प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना