Breaking News

पोलीसांची धडक कारवाई आरोपीला २४ तासात केली अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

* रस्त्यात अडवुन ऑनलाईन जबरी चोरी *

* दोन लाख आठ हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त *

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- दिनांक १६ जुन, २०२५ रात्रौ ००:४५ वाजता सुमारास यातील फिर्यादी नामे उमेश महंत साह वय ५० वर्ष रा. भद्रावती हे आपल्या मोटार सायकलवरुन राज्य महामार्गावरुन भद्रावती जात असतांना मौजा साखरवाही फाटयाजवळ फिर्यादीचे मोटार सायकलला मागेहून येणाऱ्या मोटार सायकलवरील ४ अनोळखी इसमांनी अडवुन फिर्यादीचा मोबाईल जबरीने हिसकावून घेवुन त्या मोबाईल मधुन ९१ हजार रुपये अज्ञात इसमाच्या नावाने ट्रॉन्सफर केले. फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. पडोली येथे अपराध क्रमांक ७३/२०२५ कलम ३०९ (४) ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हाय-वे वरील जबरीचोरीच्या गुन्हयाचे गांभीर्य पाहता पडोली पोलीसांनी अज्ञात मोटार सायकलस्वार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गोपनिय बातमीदार व तांत्रिक दृष्टया तपास करून २४ तासात सदर गुन्हा दोन विधी संघर्ष बालकासह आरोपी नामे (१) रुषीकेश आंबोलकर (२) अनुज महाजन यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील नमुद दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपीकडुन रोख ४४ हजार रु., एक होंडा शाईन मोटार सायकल किं. १,००,०००/- रु., चोरलेल्या पैशातुन खरेदी केलेले कपडे किं. १३,३००/- रु. आणि एकुण ४ नग मोबाईल कि. ३१,०००/- रु. असा एकुण २,०८,३००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आली असुन पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोहवा विनोद वानकर, पोअं. कोमल मोहजे, प्रतिक हेमके, धिरज भोयर, मपोअ सुचीता उमरे सर्व पोस्टे पडोली यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved