अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगांव :- या बाबत सविस्तर वृत्त असे कि या पुरस्कारासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून दोघांची निवड म.सा.प. लोककला, कलावंत, साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य कार्यालय वडाळामहादेव, ता. श्रीरामपूर, यांच्या वतीनं पुरस्कार निवड करण्यात आली तसे सन्मान पत्र मा.संत सागरकर महाराज संस्थेच्या वतीने पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून करीत असलेल्या धार्मिक सामाजिक व प्रबोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ह.भ.प. भागवत महाराज यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या पुरस्काराबद्दल यपाथर्डी शेवगांव सह अहिल्यानगर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र लोक कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारा “संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी भुषण हा पुरस्कार नुकताच पार पडला या पुरस्कारासाठी अहिल्यानगर जिल्हयातून दोघांची पुरस्कारासाठी निवड झाली. ह.भ.प भागवत महाराज मरकड यांना सांप्रदाया मधे किर्तन, भजन, गायनाच्या माध्यमातून समाजामधे जन् जागृतीचे काम गेली तीस वर्षापासून करत आहेत, त्याचे अमरापुर, चितळी, पाडळी, आव्हाने, सुसरे तसेच फलकेवाडी (सुलतानपुर खुर्द) परिसरातून पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वागत झाले. तसेच शुभेच्छा सत्कार ग्रामस्थांनी केला.त्यांना हा वारसा त्यांचे आजोबा, पणजोबा व वडीलांकडून मिळालेला आहे व ह.भ.प. रामगिरीजी महाराज हे त्यांचे गुरुवर्य आहे. या पुरस्कारामध्ये त्यांचा देखील अनमोल असा वाटा आहे असे त्यांनी मी शेवगांवकर च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
ज्वाला समाचार सच का सामना