jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यांचे आदेशानुसार जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांचे मार्गदर्शनात चिमूर विधानसभा क्षेत्रात चंद्रपूर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे. राज्य युवा सेना विस्तारक मनीष जेठाणी. माजी नगरसेवक नंदू पढाल. वरोरा विधानसभा समन्वयक वैभव डहाने. यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली.चंद्रपूर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या समस्या जाणून घेत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासंबंधाणे सूचना दिल्या व घर तेथे शिवसैनिक तयार करा व विधानसभा क्षेत्रात कसून कामाला लागा अशा सूचना दिल्या. नवनियुक्त जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांचे प्रथम भेटीने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य व उत्साह निर्माण झाला.

यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भाऊराव ठोंबरे. श्यामसुंदर खांदाडे यांचा जिल्हाप्रमुख यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत रवींद्र शिंदे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या सहकाऱ्याने चिमूर विधानसभा भगवामय करू अशी प्रतिक्रिया मिडिया प्रतिनिधी जवळ व्यक्त केली.यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे. नाजीम शेख. श्रीहरी सातपुते. भय्याजी कारेकर. केवळसिंग जुनी. बंडू पांडव. नितीन लोणारे. राजेंद्र जाधव. किशोर उकुंडे. मनोज तिजारे. किसन कावळे. अंकित कारेकर. अशांक सालेकर. देवानंद मसराम. समीर बल्की. सुनिल हिंगणकर सह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना