४५,२१,५४०/- रु चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
यवतमाळ :- यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयाचे समूळ उच्चाटण व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळ यांनी अधिनस्त पथकांना गोपनिय माहिती काढून प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पांढरकवडा उपविभागात असतांना पथकास गोपनिय माहिती प्राप्त झाली.
की,पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीतील ग्राम पाटण बोरी येथे असलेल्या कोल सीटी सोशल क्लब मध्ये बाहेर जिल्हयातील तसेच शेजारील राज्यातील जुगाराचे शौकीन लोक तेथे जुगार खेळण्यासाठी येत असुन सदर क्लब मध्ये सोशल क्लबचे नावावर अवैध रित्या जुगार खेळविला जातो,त्यावरुन स्था.गु.शा पथकाने माहितीची खातरजमा करुन माहितीमध्ये तथ्य आढळुन आल्याने वरिष्ठांचे मार्फतीने जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचे कडुन कारवाई करणे संबंधाने आदेश प्राप्त करुन दिनांक २६/०१/२०२५ रोजी पाटणबोरी येथील कोल सीटी सोशल क्लब वर पंचासमक्ष छापा कारवाई केली.असता सदर सोशल क्लबमध्ये खालील प्रमाणे ईसम जिल्हाधिकारी,यवतमाळ यांनी सोशल क्लब करीता घालुन दिलेल्या अटी व शर्थीचे उल्लंघन करुन पैशांची बाजी लावुन हार जितचा जुगार खेळ खेळतांना आढळुन आले आहेत.
१) संतोष के सुदर्शन रा.लेकेश्वर जि.निर्मल, २) बैंकटेश्वर परलु सुब्बाराव रा. गुडडुवन पालम,३)श्रीनिवास गंगाराजू सरस्वती रा.भरत नगर, ४)टी संतोष मधुकर तारपेल्ली रा.भोक्तापुर जि.अदिलाबाद,५) एम शेखर सुदर्शन मेदरी रा. हंसापुर जि.निजामाबाद,६) गजानन इस्तारी राजन रा. भेदोडा ता.बेला जि.आदिलाबाद, ७)गोणे मनोहरराव रामचंद्रराव रा. बालाजी रेसीडेन्सी सेवन हिल्स जि. मंचेरियल,८) अंजनिल नारायणा मेरगु रा.साई हनुमान नगर जि.मंचेरीयल,९) कोंडलराव लिंगाराव श्रीगोंड रा. बेगमपल्ली चोरस्ता जि. मंचेरीयल,१०)बालाजी जगननाथ खन्ना रा.प्रगती नगर जि.निजामाबाद,११)पुली तिरुपती साया गौडु रा.मोढेवाडा जगतीयल जि.करीमनगर, १२) विजय भास्कर गंगारेड्डी रा. रामपुर डिचपल्ली,१३) पुरुषोत्तम भुमय्या ताटिकोंडा रा. पेटपल्ली, १४) गुंडेवराबी कुम्मालु गुंडेटी रा. सर्गेम जि. वरगल तेलंगना, १५) मो. हारुन रशिद मो. शमसोद्दीन रा. जग्गतीयाल, १६) बंदरराव रमेश चिन्ना रा. करीमाबाद, १७) व्यकंट लाल कैरा रा. जग्गीदत्यालय,
१८) राजु उर्शन्ना पारपेल्ली रा. जिम्मा, १९) राजेश्वर बुचची रेडी रतनावार रा. चैनॉर, २०) राजेंद्र किष्टया थोटा रा. मूलकला, २१) कृष्णम्माचारी लक्ष्मीनारायण यदुलाबाद रा. बोनगीरी, २२) मनोज कुमार विजयकुमार कोयाडा रा. पोपाला गुटटा, २३) राजु कोमरयया अंकती रा. मोगली चरला, २४) श्रीनिवास मारकंडयया दाँतुला रा. परकल, २५) जगदीश्वर विरेशंम गोरंटी रा. सुभाष नगर निजामाबाद, २६) शंकर चेरालु कोडीगुडी रा. मलकाजगीरी, २७) मनोहर किष्टंयया बडलागट्टु रा. शिक्षक कॉलनी जि. आदिलाबाद, २८) रविद्रराव जगाराव चिटीनेनी रा. बेल्लम पल्ली, २९) महेंद्र मलेशंम गोरे रा. लक्ष्मीपुरम, ३०) रामदेव चंदू गुगूलोत रा. गुडलासिंगारम,३१) व्यंकटेश यादगिरी जल्ला रा.अन्ना नगर बालम,३२) सुभाष अडेल्लु मोहिजे रा.तरोडा जेयनत, ३३) कंदी दामोधर राजा रेड्डी रा. जन्मभुमी नगर, ३४) वाय राजेशकुमार बाय सुंदरराव रा. अकोली ता. केळापुर जि. यवतमाळ, ३५) ज्ञानेश्वर उध्दव देवगडे रा. भद्रावती जि. चंद्रपुर असे अवैधरीत्या हार जितचा जुगाराचा खेळ खेळतांना आढळून आल्याने त्यांचे ताब्यातील नगदी रक्कम तसेच जुगार खेळण्याकरीता उपयोगात आणलेले साहित्य, डि.व्ही.आर तसेच २९ मोबाईल फोन,०६ चारचाकी वाहन,इंग्रजी दारु असा एकुण ४५,२१,५४०/-रु चा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपीतां विरुध्द पोलीस ठाणे पांढरकवडा येथे महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे कारवाई नोंद करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप,यांच्या मार्गदर्शनात सतिश चवरे पो.नि.स्वागुशा, सपोनि अजयकुमार वाढवे,विजय महाले,पोउपनि धनराज हाके,गजानन राजमल्लु,पोलीस अंमलदार,सै.साजीद,उल्हास कुरकुटे,सुनिल खंडागळे,सुधिर पांडे,बबलु चव्हाण, रुपेश पोली,योगेश डगवार,सुधिर पिदुरकर,निलेश निमकर,रजनिकांत मडावी,अमित झेंडेकर,सलमान शेख, देवेंद्र होले,योगेश टेकाम,सतिश फुके, अमित कुमरे सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
ज्वाला समाचार सच का सामना