जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील जामगाव येथील डॉ.प्रा मोरेश्वर नन्नावरे यांच्या डिजिटल बँकिंग या पुस्तकाचे प्रकाशन शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकोट जिल्हा अकोला येथे नुकतेच संपन्न झाले, चिमूर तालुक्यातील जामगाव येथील डॉ.प्रा.मोरेश्वर नन्नावरे श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकोट जिल्हा अकोला येथे प्राध्यापक आहेत.डॉ.नन्नावरे एम.ए.सेट. एम फिल.पी एच डी. (अर्थशास्त्र).बी ए पदवी वर्ग 15 वर्ष व एम ए पदव्यूत्तर 9 वर्ष अध्यापन कार्याचा अनुभव असणारे डॉ नन्नावरे यांनी लोकसंख्या शास्त्र. मानवी विकास. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. परीचातमक अर्थशास्त्र. पर्यटनाचे अर्थशास्त्र इत्यादी दहा पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.
नुकत्याच त्यांच्या डिजिटल बँकिंग 2024 या पुस्तकाचे प्रकाशन श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकोट जिल्हा अकोला येथे अर्थशास्त्र विभागाद्वारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील पांडे. अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष प्रा. डॉ. आर बी भांडवलकर. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रशांत काठवले. श्रीमती केशरबाई लांहोटी. प्रा.डॉ.राजेश चौहान. यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.डिजिटल बँकिंग पुस्तक प्रकाशन वेळी उपप्राचार्य प्रा डॉ विलास तायडे. ख्यातनाम कवी समीक्षक प्रा. डॉ अशोक इंगले. प्रा. डॉ संतोष कायांदे राज्यशास्त्र विभाग.डॉ. एम के नन्नावरे अर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच महाविद्यालयातील विभाग प्रमुख.प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
ज्वाला समाचार सच का सामना