८१ शेतकऱ्यांनी घेतला शिबिराचा लाभ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे ,चंद्रपूर व तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे, चिमूर यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी शिकावू अनुज्ञप्ती शिबिर राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय, चिमूर येथे दिनांक.२८/१२/२०२४ ला वेळ सकाळी ०९ ते ०३ वाजे पर्यंत घेण्यात आले.यावेळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक कमलेश खाडे तसेच नरेंद्र कुमार उमाले यांनी कॅम्पची सकारात्मक मांडणी करून ८१ शेतकऱ्यांना चालक परवाना लर्निंग लायसन प्रदान केले. हे दोन्ही अधिकारी आरटीओ चंद्रपूर येथील कर्तव्यदक्ष अधिकारात गणले जात असून नेहमीच यांची जिल्ह्यात चर्चा बघावयास मिळत असते.
राज्य शासनाच्या अशा लर्निंग लायसन्स शिबीराच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमा विषयी मोटर वाहन निरीक्षक यांच्याद्वारे शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.तसेच जीवन सुरक्षित ठेवून वाहन चालविणे या विषयावर सुद्धा माहिती देऊन अपघाताला आढा कसा घालता येईल यावर सुद्धा माहिती देण्यात आली.
ज्वाला समाचार सच का सामना