जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा ते चिमूर राष्ट्रीय महामार्गावर शेगाव पासून ३ किमी अंतरावर असलेल्या भेंडाळा जवळ आज दिनांक २३/०६/२०२४ ला ०४:०० वाजताच्या दरम्यान ट्रक व दुचाकीच्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला असून वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई हा मागील कित्येक वर्षापासून अर्धवट स्वरूपात असून कासव गतीने काम सुरु आहे. या आधी एस.आर.के.कंपनीकडे या महामार्गाचे काम देण्यात आले होते. परंतु आठ वर्षे लोटूनही कंपनीने रस्त्याचे काम पूर्ण न केल्यामुळे शेगाव येथे तसेच परिसरात या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्या संदर्भात अनेक निवेदने देण्यात आली ज्यामध्ये रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.
याची दखल घेत गडकरी यांनी एस.आर. के. कंपनीला कामावरून निलंबित करून के.सी.सी. कंपनीला संबंधित रोडचे काम देण्यात आले. परंतु सदर कंपनी कडून सुद्धा रोडचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. ठिकठिकाणी पुलाचे व रोडचे काम अर्धवट परिस्थितीत आहे. ज्या ठिकाणी पुलाचे काम अर्धवट आहे अशा ठिकाणी व जिथे रस्ता संपतो अशा ठिकाणी कंपनी कडून सूचनाफलक लावणे अपेक्षित असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची सूचनाफलक किंवा रिबन बांधले गेलेले नसल्यामुळे यावर वारंवार अपघात होत आहे.पावसाळ्याला दिवसाला सुरुवात झाली असून अशाच प्रकारचा एक अपघात मागील आठवड्यात बामणडोह जवळ कारला कारची मागून धडक दिल्यामुळे चंद्रपूर येथील काही डॉक्टर गंभीर जखमी झाले होते.
त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. या घटनेला आठवडा होतो ना होतो तोच आज भेंडाळ्या जवळ एका ट्रकवर दुचाकी आदळून दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव पंकज भरडे सुसा येथील असून चोवीस वर्षे आहे, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 353 ई हा आणखी किती जिव घेणार व आणखी किती निरप्राण लोकांचा जीव गेल्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना तसेच प्रशासनाला जाग येईल हाच प्रश्न जनतेला पडलेला आहे ? या अपघातातील ट्रक जागेवरून पसार झाल्याने अज्ञात ट्रकने इसमाच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. या अपघातातील दुचाकी क्रमांक एम एच ३४ बी डब्ल्यू १२५८ घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय सुरजुसे यांच्या मार्गदर्शनात मदन येरमे व हरिदास चोपणे करत आहे.
ज्वाला समाचार सच का सामना