Breaking News

दणका शेवगाव तालुक्यातील चार ह. भ. प. महाराजांनी मोडला गुंतवणूकदारांचा मणका

शेवगाव शहर आणि तालुक्यातील चार महाराज नॉट रिचेबल डोंगरे हरवणे अकोलकर आणि कवडे महाराज गायब

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटचे सुमारे 25 बिग बुल गायब असताना शॉर्टकट मध्ये श्रीमंत होण्याची चटक लागलेले चार ह.भ.प. महाराज श्री गणेश महाराज डोंगरे आखेगांव महेश महाराज हरवणे वडुले खुर्द हरी महाराज अकोलकर भयगांव कुकाणा ज्ञानेश्वर महाराज कवडे रावताले कुरुडगाव गेल्या कित्येक दिवसापासूननॉट रिचेबल आहेत यांच्याकडे इतर महाराज मंडळी त्यांचे भक्तगण व सर्वसामान्य जनतेचे कोट्यावधी रुपयांच्या पावत्या / ठेवी आहेत कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित लोकांना हातातील भाषणाचा माईक गरम होईपर्यंत उपदेश देणारे भाषणातून मोठमोठ्या गप्पा करणारे तालुक्यातील गोरगरीब आणि कष्टाळू जनतेला चुना लावून फरार झाले आहेत एका महाराजांचे कार्यालय शेवगाव शहरातील पाथर्डी रोड ला होते.

दुसऱ्या महाराजांचे ऑफिस मिरी रोडला एका टॉवर मध्ये होते एका महाराजांचे कार्यालय आखेगाव मध्ये होते तर एक महाराज मोबाईल ऑफिस { फिरते कार्यालय } चालवीत होते एका महाराजांनी गावाकडील 9 ते 10 एकर शेती विकून आळंदीला सुमारे कोटी रुपयांचा फ्लॅट घेतल्याची चर्चा आहे दुसऱ्या एका महाराजांनी लोकांच्या हरलेल्या पैशातून माऊलींना चांदीचा मुकुट करून मोठा कार्यक्रम आळंदी येथे पार पाडला होता राम नाम जप ना आणि परायण मला पुन्हा लोकांचा साधू संतांवर फार मोठा भरोसा असतो त्यांनीच लोकांची पार खोलून मारली त्यामुळे तालुक्यात काही भांड्या तरुणांनी हजारो कोटी रुपयांना चुना लाऊन शेवगाव शहर आणि तालुक्याचे मार्केट 15 वर्षे मागे नेऊन घातले आहे अनेक लोकांनी आपल्या लेखी बळीच्या लग्नासाठी म्हातारपणाची काठी म्हणून पोट दुखणे पाहण्यासाठी जमापुंजी ठेवली होती त्यानंतर काही लोकांनी वावर गहाण ठेवून सोनू नाना मोडून या चोरांची घर भरली “लालच बुरी बाला होती है” एक लाख रुपयाला महिन्याला 11 हजार ते 17 हजार रुपये व्याज देणारी जगात कुठलीही बँक अथवा आर्थिक संस्था नाही परंतु शेवगाव करांना भुरळ घालून चार नॉट रिचेबल महाराज पकडून फरार शेअर मार्केटचे बिग बुल ची संख्या सुमारे 30 झाली आहे.

*ताजा कलम*

काही भामटे बिग बुल सोशल मीडिया वरून त्यांच्या त्यांच्या गुंतवणूकदारांना अंधारात गोंजारत आहेत तर काही काही सरळ धमक्या देत आहेत जर तुम्ही आमच्यावर कायदेशीर कारवाई केली तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा लोकांचे पैसे असेही हरणाच्या शिंगाला बांधलेले आहेत आता मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ??? यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई कोण करणार ???

{ क्रमशः }

*सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अभिनय देशमुख यांच्या बातम्यांमुळे आम्ही गाव सोडून आलो त्याचा बंदोबस्त करा त्याला समजावून सांगा नाहीतर त्याचा गेम करा आशा सूचना त्यांनी पाळलेला गुंड पुंडांना देण्यात येत आहेत*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved