*”आठवणीतील शेवगाव” या डॉ. मेधा कांबळे लिखित पुस्तकाचे 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता ममता लॉन्स येथे मान्यवरांच्या हस्ते भव्य पुस्तक प्रकाशन*
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायीक, सामाजिक कार्यकर्त्या,यशस्वी राजकारणी,समाजकार्यात हिरीरीने पुढाकार घेणाऱ्या आपल्या अंतर्मनातील लेखक व कवीत्व जपणाऱ्या डॉ. मेधा कांबळे यांनी शेवगाव शहराच्या स्थापनेपासून ते आज पर्यंतचा धांडोळा आपल्या लिखाणातून घेतला आहे.शेवगाव शहराचं ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, कला, साहित्य स्वातंत्र्य चळवळ भौगोलिक आर्थिक मागोवा घेण्याचा प्रयत्न आपल्या पुस्तकातून केला आहे.

या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ममता लॉन्स मिरी रोड येथे शनिवारी 18 मे शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते शेवगाव तालुक्याचे भूमिपुत्र डॉ. पुरुषोत्तम भापकर { संभाजीनगरचे आयुक्त } यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाचे अध्यक्ष मा.डॉ सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली,हजारो मनोरुग्णांना जगण्याचे विविध मार्ग दाखवणारे डॉ. राजेंद्र धामणे अहमदनगर, प्रसिद्ध कवी डॉ. कैलास दौंड पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सूत्रसंचालन श्रीमती विजया मते पुणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शेवगाव शहर तालुका अहमदनगर जिल्हा येथील डॉ मेधा कांबळे यांचे आप्त स्वकीय हितचिंतक आणि वाचकांच्या उपस्थितीमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे.हेच आग्रहाचे निमंत्रण समजून कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन असिस्टंट कमांडट नरेंद्र गच्ची व सौ.दीक्षा नरेंद्र गच्ची यांनी केले आहे.
*ताजा कलम*
*शेवगाव शहरात “महात्मा सार्वजनिक वाचनालय” सुमारे 125 वर्षांपूर्वी स्थापन झालेली वाचन संस्कृतीचा वारसा जपणारी संस्था अनेक लेखक नाटककार कवी यांचा समृद्ध वारसा आहे. त्यात भर घालण्याचे काम “आठवणीतील शेवगाव” या पुस्तकांनी केले आहेगेली तीन ते चार वर्ष रात्रंदिवस मेहनत करून अनेक संदर्भांचा अभ्यास करून डॉ मेधा कांबळे यांनी पुस्तक लिहिले आहे एक शेवगावकर म्हणून त्यांच्या कार्याला सलाम*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*
ज्वाला समाचार सच का सामना