Breaking News

चिमूर तालुक्यातील खानगाव येथील घटना – पट्टेदार वाघाने शेतकऱ्यास केले ठार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-दिनांक.१५/०५/२०२४ ला चिमूर तालुक्यात येत असलेल्या खानगाव येथे पट्टेदार वाघाने युवकास ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे आहे की खानगाव येथील मृतक युवक अंकुश श्रावण खोब्रागडे वय ३४ वर्ष या युवकाला पट्टेदार वाघाने ठार केल्याची घटना घडली. मृतक युवक अंकुश हा आपल्या शेतामध्ये दररोज स्वतःच्या शेतात मालाची तसेच जनावरांची देखरेख करण्यासाठी रात्रीला माऱ्यावर झोपण्यास जात होता काल रात्री देखील हररोज प्रमाणे जेवण करून झोपण्यासाठी स्वतःच्या शेतात गेला होता.

एक झोप झाल्या नंतर रात्री ला शौचास शेती लगत असलेल्या नदी पाटात शौचास बसल्या बरोबर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक अंकुशवर हल्ला करून अंकुशला जागीच ठार केले व पूर्णतः आपली भूक भागवली. याची माहिती सकाळी ०७:०० वाजले तरी देखील अंकुश घरी परतला नसल्याचे समजले व का घरी आला नाही म्हणून त्यांचे भाऊ शेतात बघायला गेले तेव्हा झोपडीत त्याची चप्पल व मोबाईल बाहेरच पडून दिसल्याचे आढळून आले. तेव्हा त्याचा आजूबाजूला शोध घेतला असता त्याचा मृतदेह नदी पाटात दिसला आणि याबाबत ची माहिती गावकऱ्यांना मिळाली असता वनविभागास सुद्धा याची माहिती दिली. यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमल्याने काही वेळ तनावाचे वातावरण निर्माण झाले. व पुढील तपास शेगाव पोलीस प्रशासन तसेच वन विभाग करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved