Breaking News

पंतप्रधान पेयजल योजने अंतर्गत शेवगांव तालुक्यातील कोळगाव वंचित ठेवण्याचे पाप करतंय कोण ????

कोळगाव येथील गावकऱ्यांसाठीचे वॉटर फिल्टर तात्काळ सुरू करा शेवगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना छावाचे क्रांतिवीर सेनेचे निवेदन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-मौजे कोळगाव येथील ग्रामपंचायत मध्ये वॉटर फिल्टर बऱ्याच दिवसापासून मंजुर आहे, परंतु कोळगाव ग्रामपंचायत जागेचा वाद पूढे करून सदर वॉटर फिल्टर बसवत नाही. त्यामुळे शुद्ध पाण्यापासुन गावकरी वंचित आहे. त्याकरिता सदर तक्रार छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे, मौजे कोळगाव येथील वॉटर फिल्टर तात्काळ एक ‘बसविण्यात यावे नसता छावा संघटना मार्फत आपल्या कार्यालयासमोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे.

असे निवेदनाद्वारे शेवगाव गट विकास अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे, यावेळी उपस्थित छावा क्रांतिवीर सेना तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाघ उप तालुकाध्यक्ष परमेश्वर पवार,लहू वाघ,महेश झिरपे,प्रदीप झिरपे,ज्ञानदेव कोरडे,माजी उपसरपंच आदिनाथ झिरपे,सोन्याबापू झिरपे,राहुल झिरपे,विष्णू वाघ, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

*ताजा कलम*

शासन नियमानुसार प्रत्येक गावात पाणी पुरवठा साठी नऊ सदस्यांची समिती नेमने आवश्यक असते. कोळगाव गावात मात्र ग्रामपंचायतद्वारे अशी कोणतीही समिती गठित करण्यात आलेली नसून यामुळे गावकऱ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. गावात ग्रामपंचायत अस्तित्वात असूनही गावकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणीही उपलब्ध होत नसल्याने गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सदर प्रश्न हा गावकऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने तात्काळ याचे निवारण करण्यात यावे अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved