Breaking News

‘स्वयंसिद्धा’ संस्थेच्या श्रद्धा किन्नाके द्वारे कराटे प्रशिक्षकांची आर्थिक फसवणूक: लेखी पोलिस तक्रार दाखल

जुने आर्थिक व्यवहार योग्यपूर्ण झाल्याशिवाय संस्थेची नवीन कामे थांबवा: डॉक्टर सुशांत इंदोरकर यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर/चिमूर:-विद्यार्थिनींना गुन्हेगारांविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे यासाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात कराटे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या आधुनिक युगातही विद्यार्थिनी पूर्णपणे सुरक्षित नाहीत. त्यासाठी विद्यार्थिनींना स्व:संरक्षणाचे प्रशिक्षण व तंत्रज्ञान यांचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अनुभवी मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांकडून मुलींनी सुरक्षित वातावरणात व्यावहारिक संरक्षण तंत्र शिकणे आवश्यक आहे. यासाठी मे. स्किल ट्री कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड यांची सेवा पुरवठाधारक म्हणून निवड करण्यात आली. त्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे .त्यानुसार जिल्ह्यातील शाळेत मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण प्रशिक्षकामार्फत मार्शल आर्टच्या किमान एक शैली मध्ये कुशल करण्यासाठी, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांमधील मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षक श्रद्धा किन्नाके यांना मास्टर ट्रेनर नेमून सदर उपक्रम जिल्हा स्तरावर राबवण्याची जबाबदारी देण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यातील शाळेत डॉक्टर सुशांत काशिनाथ इंदोरकर यांना विद्या किन्नाके भद्रावती व श्रद्धा किन्नाके नागपूर यांचेकडून सम्पर्क साधून स्वयंसिद्धा या संस्थेद्वारे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांत राबविण्यात येणाऱ्या ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमासाठी’ शाळेत कराटे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक म्हणून योजना राबविण्याचे कार्य दिले. डॉक्टर सुशांत इंदोरकर व त्यांच्या सहकार्यांनी दोन फरवरी 2023 ते 15 एप्रिल 2023 या कालावधीत चिमूर तालुक्यातील 60 शाळा, सिंदेवाही तालुक्यातील 30 शाळा, नागभीड तालुक्यातील 33 शाळा ,व राजुरा तालुक्यातील 58 शाळांमध्ये प्रशिक्षण देण्याचे यशस्वी काम केले. त्यात त्यांनी 22 ते 25 प्रशिक्षकांची नेमणूक करून शाळेत कराटे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले परंतु स्वयंसिद्धा संस्थेकडून काही प्रशिक्षकांना तोंडाला पाने पुसल्यासारखा मोबदला देऊन काही प्रशिक्षकांना काहीच आर्थिक मोबदला न देता, प्रशिक्षकांना आर्थिक मोबदला देण्यास टाळाटाळ करीत आहेत. व फोनवर संपर्क केल्यास उडवा उडवी चे उत्तर देतात. त्यामुळे सर्व प्रशिक्षकांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार डॉक्टर सुशांत इंदोरकर यांनी पोलीस अधीक्षक चंद्रपूरला दिलेल्या तक्रारीत केलेली आहे.

आधीच जुन्या कराटे प्रशिक्षणाचे काम करणाऱ्या प्रशिक्षकांना आर्थिक मोबदला न देता त्यांची फसवणूक केली, तरीपण याच संस्थेमार्फत परत नवीन प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात येणार आहे याची माहिती व्हाट्सअप द्वारे सर्व विभाग कराटे प्रमुखांना माहिती दिलेली आहे त्यामुळे अजून अन्य लोकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता जोर धरू लागली आहे. करिता संबंधित संस्था व व्यक्तीवर योग्य ती चौकशी करून कठोर कार्यवाही करावी .तोपर्यंत पुन्हा प्रशिक्षणाचे काम सदर स्वयंसिद्धा संस्थेमार्फत कोणत्याही जिल्ह्यात देऊ नये अशी तक्रार करण्यात आलेली आहे. तक्रारदार हे एका दैनिक वृत्तपत्राचे वार्ताहर आहेत. जर पत्रकाराचे असे हाल आहेत तर इतर सामान्य जनतेला न्याय मिळणार काय ? व संस्थेसाठी इतर कामे करणार्या साध्या भोळ्या लोकांची ही संस्था अशीच आर्थिक फसवणूक तर करीत नाही ना?असे डॉक्टर सुशांत इंदोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करून प्रशिक्षकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी डॉक्टर सुशांत इंदोरकर यांनी केलेली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved