Breaking News

पिंपळापुर येथे मणिपूर घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

राळेगाव:-मणिपूर व इतर राज्यात आदिवासी समुदयावर घडत असलेल्या नरसंहार, अत्याचार व बलात्काराच्या घटनेचा निषेध करीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.राळेगाव तालुक्यातर्गत येत असलेल्या मौजा पिंपळापुर येथे बिरसा मुंडा चौकात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन हारार्पन करण्यात आले.मणिपूर मध्ये जमावाने चार मे रोजी दोन महिलांची भररस्त्यात नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असुन देशातील महिलांना विवस्त्र करून धिंड काढणे आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करणे, हि घटना मानव जातीचे मन हेलावून टाकणारी आहे.

सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. नंतर जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. ह्यावेळी प्रविण कुळसंगे, पुंडलिक कुळसंगे, राहुल कोडापे, सुहास कोवे, राहुल येडमे, चींदू चांदेकर, शंकर कुळसंगे, प्रमोद येरमे, स्वप्नील कुळसंगे, हनुमान गेडाम, बंडू चांदेकर, विशाल कुळसंगे, भानुदास मेश्राम, सुमित कुळसंगे, नागेश किन्नाके, रुपेश कुळसंगे, नागेश तोडासे, मिथुन आत्राम, नवनीत कुळसंगे, विजय कोडापे, गुलाब मेश्राम, दुर्गाबाई चांदेकर, विद्या कोडापे, माला कुळसंगे, फुलाबाई कुळसंगे, सुनंदा मेश्राम, सुनिता चांदेकर, जनाबाई कुळसंगे, सुमनबाई कुळसंगे, माया कुळसंगे, ताराबाई चांदेकर, सुरेखा किन्नाके आदी महिला, पुरुष समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved