Breaking News

जिल्ह्यात आय फ्लू व साथीच्या रोगाने घातले थैमान

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

यवतमाळ:-पावसाळा सुरू झाला की विविध आजाराच्या साथी पसरत असतात. पाऊस सुरू झाल्यावर हवेत निर्माण होणारा गारवा आणि पाऊस थांबल्यानंतर अचानक येणारे दमट आणि उष्ण वातावरण या आजारासाठी कारणीभूत ठरत असतात. शहरातील सध्याच्या परिस्थिती मध्ये दवाखान्यात रुग्णाची गर्दी च गर्दी बघायला मिळत आहे. अशातच साथीच्या अनेक आजाराने डोके वर काढले. डोळे येण्याच्या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. कडक ऊन मध्येच ढगाळ स्थिती, हलका पाऊस असे वातावरणात सतत बदल होत आहे त्यामुळे मागील काही दिवसांपासून राळेगाव शहर व ग्रामीण भागात सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी, असे साथीचे आजार वाढत आहे.

अशा अनेक साथीच्या रोगापासून वाचण्याकरिता त्वचा जास्त वेळ ओली ठेवणे टाळावे, बाहेर शिजविलेले तेलकट अन्नपदार्थ खाणे टाळावे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, मुबलक पाणी पिणे, मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. विटामिन सी युक्त लिंबूवर्गीय फळे व समृद्ध आहार घेणे यामुळे प्रतिकार शक्ती वाढते हा यावर उपाय आहे. शिवाय ताप, येणे घसा खवखवणे, डोकेदुखी, थंडी वाजणे, लाल डोळे, थकवा येणे अशा लक्षणाकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरला दाखवून योग्य उपचार घेणे असे आव्हान आयुष्य मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल व तालुका डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. ओम प्रकाश फुलमाळी यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved