Breaking News

पुयारदंड ग्रामपंचायत समस्यांच्या विळख्यात

गावातील समस्या ताबडतोब दूर करा – शिवसेनेच्या वतीने दिले ग्रामसेवक व सरपंचाला निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर/पुयारदंड:-चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथील ग्रामपंचायतला अनेक समस्याकरीता शिवसेना पक्षा तर्फे निवेदन देण्यात आले आहे. पुयारदंड येथे नळ योजनेच्या माध्यमातून गावात पाणी पुरवठा केला जातो, मात्र नळाला येणारे पाणी दुषीत असुन पिण्यायोग्य नाही. तसेच गावातील सिमेंट काँक्रीटचे नाली असून नालीचे उपसा मागील कित्येक महिण्यापासून झालेला नाही. त्यामुळे गावातील नाल्या काडीकचऱ्याने भरलेल्या असून पावसाच्या पाण्यामुळे नालीतील धाण गावामध्ये पसरुन आरोग्य धोकादायक ठरू शकतो.

तसेच गावात जिल्हा परिषद शाळेची इमारत जिर्ण झालेली आहे. त्यामुळे सदर इमारत कधीही कोसळु शकते व त्यात विद्यार्थांचा जिव जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आंगणवाडी केंद्राला संडासचे बांधकाम न केल्यामुळे लहान बालकांना बाहेर शौच्छास जावे लागत आहे. तसेच पोस्ट ऑफीसला ग्रा. पं. ने जागा उपलब्ध करून दिल्यामुळे किरायाचे घरी पोस्ट ऑफीस सुरू आहे. जुन्या ग्रामपंचायत इमारतीवर नविन टिन लावण्यात यावी याबाबतचे शिवसेना पक्षातर्फे समीर बल्की यांनी निवेदन दिले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved