Breaking News

खैरी परिसरात पावसाचा हाहाकार : शेतातील पिके पाण्याखाली

खैरी वरोरा राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

यवतमाळ:-यवतमाळ जिल्हा सीमेजवळ राळेगाव तालुक्यातील खैरी परिसरात दिनांक 26 जुलै पासून सुरू झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार घातला असून खैरी परिसरातील कोच्ची, सावंगी, कोसारा, बोरी , धानोरा रीठ, दापोरा,चिंचमंडळ येथील अनेक शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली आली . तसेच वर्धा नदीवर असलेल्या पुलावरून पाणी असल्यामुळे खैरी – वरोरा या राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे .

दिनांक 26 जुलै सायंकाळ पासून खैरी परिसरात सतत धार पाऊस सुरू असून नदी नाल्यांना पूर येऊन शेतामध्ये पुराचे पाणी शिरले असून शेत पिके पाण्याखाली आली असून शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आधीच मेटकीटीस आलेला शेतकरी या पावसामुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीमुळे हतबल झाला आहे. आता शेतकऱ्यावर त्या ओढवलेल्या संकटावर शासनाकडून काय मिळते व शासन काय मदत करतील या आशेवर शेतकरी विसंबून आहे. तसेच या पावसामुळे खैरी ते वरोरा हा राज्य मार्ग वरील वाहतूक पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे ठप्प झाली असून पूला शेजारी बॅरिकेट लावून मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक पुलाजवळ तैनात आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चंद्रपूर पोलीस संघ सलग ११ व्या वेळी जनरल चॅम्पियन

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in.   …

रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी व वाहतूक सुरूच

Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar. Jwalasamachar.in. * …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved